वक्तृत्व स्पर्धेत श्रावणी व अंकिता प्रथम

बॅ.खर्डेकर महाविद्यालयातील ग्रंथालय उपक्रमा अंतर्गत शिवजयंतीचे औचित्य साधून सलग २३ व्या वर्षी आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. उद्घाटन प्रा.वामन गावडे यांच्या हस्ते झाले. यावेळी कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक शितोळे, संस्था प्रतिनिधी सुरेंद्र चव्हाण, परिक्षक डॉ.पी.आर.गावडे, डॉ.बी.जी.गायकवाड, प्रा.व्ही.पी.नंदगिरीकर, प्रा.शशांक कोंडेकर उपस्थित होते.

     खुल्या गटासाठी छत्रपती शिवाजी महाराजांची धर्मसहिष्णूताहा विषय ठेवण्यात आला होता. यात प्रथम-अंकिता पाटील, द्वितीय-अमित कुंटे, तृतीय-सायली खोत, उत्तेजनार्थ-संग्राम कासले, वीणा गावडे तर शालेय गटासाठी रयतेचा राजा शाहू महाराजहा विषय ठेवण्यात आला होता. यात प्रथम-श्रावणी आरावंदेकर, द्वितीय-अदिती चव्हाण, तृतीय-दिप्ती गवसकर, उत्तेजनार्थ-कर्तृत्वा हरकुळकर व अमृता नवार यांनी क्रमांक पटकाविले. खुल्या गटाचे परिक्षण डॉ.पी.आर.गावडे, प्रा.व्ही.पी.नंदगिरीकर यांनी तर शालेय गटाचे परिक्षण डॉ.बी.जी.गायकवाड, प्रा.शशांक कोंडेकर यांनी केले. सूत्रसंचालन प्रा.डॉ.सचिन परूळकर यांनी, स्वागत सुनिल आळवे यांनी तर प्रा.पी.एम.देसाई यांनी आभार मानले.

Leave a Reply

Close Menu