सिधुरत्नमधून दहा बचतगटांचे कर्ज प्रस्ताव मंजूर-मुख्याधिकारी कंकाळ

दिनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय उपजीविका अभियान, माझी वसुंधरा अभियान व स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत महिला दिनाचे औचित्य साधून वेंगुर्ला न.प.मार्फत ११ मार्च रोजी कॅम्प येथील नाटककार मधुसूदन कालेलकर सभागृहात बचत गट स्नेहमेळावा घेण्यात आला. यावेळी पर्यावरण दूत डॉ.धनश्री पाटील, प्रशासकीय अधिकारी संगिता कुबल, साप्ताहिक किरातसंपादक सीमा मराठे, सहाय्यक प्रकल्प अधिकारी विलास ठुंबरे, हिरकणी शहर स्तर संघ अध्यक्ष मेघा पडते उपस्थित होते.

     बचतगटांना बाजारपेठ मिळवून देताना महिलांच्या कलागुणांना वाव देणारे हक्काचे व्यासपिठ म्हणजे वेंगुर्ला नगरपरिषद. सिधुरत्न समृद्ध योजनेंतर्गत दहा महिला बचतगटांचे व्यवसायासाठी अनुदानीत कर्ज प्रस्ताव मंजूर झाले आहेत. अधिकाधिक बचत गटांनी व्यवसाय करण्यासाठी पुढे यावेत. त्यासाठी न.प. सर्वोतोपरी सहकार्य करेल असे आश्वासन मुख्याधिकारी परितोष कंकाळ यांनी दिले.

      गेल्या दहा वर्षात वेंगुर्ल्यातील बचत गटांचे कामकाज हे विशेष उल्लेखनीय आहे. जवळपास ११० महिला बचत गटसध्या कार्यरत असून त्यातून महिलांचा आर्थिक स्तर वाढविण्यात हातभार लागत  असल्याबद्दल सीमा मराठे यांनी न.प.चे कौतुक केले.

      या मेळाव्यात बचत गटांना प्रोत्साहन म्हणून उत्कृष्ट सीआरपी-सुशिला रेडकर, उत्कृष्ट बचत गट-आशा महिला बचत गट, उत्कृष्ट वस्ती स्तर संघ ओम-शामल केनवडेकर, उत्कृष्ट वस्ती स्तर संघ अध्यक्ष वैभवी पालव, उत्कृष्ट बचत गट अध्यक्ष स्मिता कोणेकर, उद्योजक-स्वाती बेस्ता, बचत गटातील अष्टपैलू व्यक्तीमत्व-शिवानी तामणेकर, जॉयसी फर्नांडीस, निर्मल कुडपकर, सुहानी जाधव, आस्मीना मकानदार यांना तसेच प्रातिनिधीक स्वरूपात मेघना घाटकर व सेजल जाधव या सफाई कर्मचा­यांना गौरविण्यात आले. पर्यावरण दूत म्हणून डॉ.धनश्री पाटील यांना तर स्वच्छता दूत म्हणून सीमा मराठे यांना मान्यवरांच्या हस्ते बांबूपासून बनविलेले पर्यावरण पूरक कंदिल देऊन सन्मानीत करण्यात आले. तर बचतगटांसाठी विविध योजना राबवून महिलांचा आर्थिक स्तर उंचाविण्यासाठी प्रयत्नशील असणारे मुख्याधिकारी परितोष कंकाळ यांना सर्व बचतगटांमार्फत सन्मानीत करण्यात आले. स्नेहमेळाव्यात विविध उपक्रम घेण्यात आले.

     अक्षय ऊर्जेचा वापर म्हणजेच पर्यावरणाचे संरक्षण, आर्थिक वाढ व सामाजिक आरोग्याला योगदान देणारे आहे. याचे महत्त्व महिलांपर्यंत पोचविण्यासाठी व प्रधानमंत्री सुर्योदय योजनायाची माहिती, अर्ज करण्याची प्रक्रिया, पात्रता आदींविषयी भूषण राणे यांनी मार्गदर्शन केले. कोकेडामाहे घर किवा कार्यालयासाठी आकर्षक व सौंदर्यदृष्ट्या आनंददायी भेट आहे. याची वाढती मागणी बघता ही एक व्यवसायाची संधी ठरत आहे. हे लक्षात घेत कोकेडामातयार करण्याचे व त्यापासून व्यवसाय कसा निर्माण करण्याचे प्रशिक्षण डॉ. धनश्री पाटील यांनी दिले. घरात निर्माण होणारा ओल्या कच­यापासून घरीच खत निर्मिती, ओल्या कच­याचे व्यवस्थापन घरगुती स्तरावर करून त्यापासून आपल्या जमिनीची जैविक गुणवत्ता कशी वाढवावी यासंबंधीचे प्रात्यक्षिक प्रा.प्रितिश लाड यांनी दिले. महिलांना कचरा वर्गीकरण व प्लॅस्टिक बंदी याबद्दलची जागृती सोप्या पद्धतीने खेळांच्या माध्यमातून करण्यात आली. न.प.मार्फत विविध मनोरंजक स्वच्छतेचे खेळ घेण्यात आले. महिलांनी   वसुंधरेचे रक्षण व संवर्धन करण्याची शप्पथ घेतली.

     सिंधुरत्न समृद्ध योजनेअंतर्गत ज्या बचतगटांचे ७५ टक्के अनुदानीत कर्जप्रस्ताव मंजूर झाले. त्यामध्ये खाद्य पदार्थ, काजूप्रक्रीया युनिट, मसाला व्यवसाय, नारळापासून विविध खाद्यपदार्थ बनविणे, सुकेमासे इत्यादी व्यावसायिक बचतगटांना पुढे व्यवसाय उभारणीसाठी मार्गदर्शन करण्यात आले. डे एनयूएलएम अंतर्गत यावर्षी मंजूर झालेले वैयक्तिक कर्जप्रस्ताव, बचतगटांचे कर्जप्रस्ताव, पीएम स्वनिधीमधील कर्जप्रस्ताव यांचा आढावा घेऊन त्याविषयी मार्गदर्शन केले.

      बचत गटांतील महिलांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. त्याचे सूत्रसंचालन मयुरी परब आणि ऐश्वर्या सावंत यांनी केले. तर प्रास्ताविक व आभार संगीता कुबल यांनी मानले.

 

Leave a Reply

Close Menu