बांधकाम कामगारांना गृहपयोगी साहित्यांचे वाटप

महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ, महाराष्ट्र शासनाच्यावतीने १३ मार्च रोजी वेंगुर्ला तालुक्यातील बांधकाम कामगार बांधवांना भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना देसाई यांच्या उपस्थितीत गृहपयोगी साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर, शक्तिकेंद्र प्रमुख विजय बागकर, निवृत्त कामगार अधिकारी किरण कुबल, संगणक ऑपरेटर प्रविण जाधव व स्वाती अणावकर, किट वाटप मदतनीस अमित कुबल व विष्णू रेडकर, पुजा बागकर इत्यादी उपस्थित होते. विकसित भारत उभारणीच्या आकांक्षा पूर्ण करण्यात श्रमशक्तीचा मोठा वाटा आहे. देशाला आता आपल्या श्रमशक्तीचा अभिमान आहे. कष्टाचा आदर आणि कष्टक-­यांचा सन्मान हे मोदी सरकारचे सर्वोच्च प्राधान्य आहे. पंडित दीनदयाळ उपाध्याय श्रमदेव जयतेच्या माध्यमातून मोदी सरकार कामगारांचे सक्षमीकरण करून त्यांच्यासाठी सर्वसामावेश संरक्षणाची हमी देत असल्याचे प्रसन्ना देसाई यांनी सांगितले.

  

Leave a Reply

Close Menu