आजचा दिवस भावूक पण गोड – डॉ.संगिता मुळे

जीवन कल्पक करण्यासाठी तंत्रज्ञान अवगत करा. त्याचा योग्य वापर करा. नवनिर्मिती करताना अडचणी व चढउतार येतात. संयम ठेवा. अपयशाने खचून न जाता ध्येय साध्य करा. उज्ज्वल भविष्यासाठी समाजाशी बांधिलकी ठेऊन आवडणा-या गोष्टींमध्ये करिअर करा. आजचा दिवस भावूककडू पण गोड आहे असे प्रतिपादन स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ.संगिता मुळे यांनी केले.

      येथील बॅ.खर्डेकर महाविद्यालयातील तृतीय वर्ष कला वाणिज्य व विज्ञान या विद्यार्थ्यांचा जिमखाना विभागाच्यावतीने निरोप समारंभाचे आयोजन केले होते. यावेळी प्रमुख पाहुण्या डॉ.संगिता मुळेमुंबई विद्यापिठ सिधुदुर्ग उफद्राचे प्रभारी संचालक डॉ.सुभाष विलींगप्राचार्य डॉ.एम.बी.चौगलेप्रा. वामन गावडेप्रा.एस.एस.चमणकरप्रा.एम.आर.नवत्रे आदी व्यासपिठावर उपस्थित होते. डॉ.मुळे यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. उत्साही व्यक्तिमत्व असणा-या गुरूजनांकडून मायेची सावली व भरभरून अनुभवाची शिदोरी मिळाली असल्याचे विद्यार्थी प्रतिनिधी सचिव फाल्गुनी नार्वेकर हिने सांगितले. समाजात चांगले नागरिक बनाआपल्या विषयात आत्मसात केलेल्या ज्ञानात आणखी भर घाला असे प्रा.वामन गावडे म्हणाले. आजचा कार्यक्रम हा विद्यार्थ्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छ देण्यासाठी आहे. शिक्षण थांबत नाही. नोकरीव्यवसाय करताना कौशल्य असणे आवश्यक आहे. ज्यांनी पाठबळ दिले त्यांचे ऋण देणे आहे असे डॉ.सुभाष विलींग यांनी सांगितले. घेतलेले ज्ञान वाया घालवू नका. त्याचा उपयोग समाज घडविण्यासाठी करा असे आवाहन प्राचार्य चौगले यांनी केले.

      प्रास्ताविक प्रा.जे.वाय.नाईक यांनी केले. यावेळी सुरेंद्र चव्हाणप्रा.बी.जी.गायकवाडडॉ.मनिषा मुजुमदारप्रा.विवेक चव्हाणप्रा.एल.बी.नैतामप्रा.सचिन परूळकरप्रा.जी.पी.धुरीप्रा.राजाराम चौगले व विद्यार्थी उपस्थित होते. 

Leave a Reply

Close Menu