►नगराध्यक्ष, नगरसेवक पदाची आरक्षणे जाहीर

  वेंगुर्ला नगरपरिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदांची आरक्षणे जाहीर झाली असून नगराध्यक्षपदासाठी सर्वसाधारण प्रवर्गासाठी (खुला) आरक्षित झाले आहे.

      तर प्रभागनिहाय नगरसेवक आरक्षण खालीलप्रमाणे- प्रभाग १-  अ) नागरिकांचा मागासप्रवर्ग (महिला), ब) सर्वसाधारण, प्रभाग २ – अ) सर्वसाधारण (महिला), ब) सर्वसाधारण, प्रभाग ३- अ) नागरिकांच्या मागास प्रवर्ग, ब)सर्वसाधारण (महिला), प्रभाग ४ – अ) सर्वसाधारण (महिला), ब) सर्वसाधारण, प्रभाग ५- अ) सर्वसाधारण (महिला, ब)सर्वसाधारण, प्रभाग ६- अ)सर्वसाधारण (महिला), ब) सर्वसाधारण, प्रभाग ७ – अ) नागरिकांच्या मागासप्रवर्ग (महिला), ब) सर्वसाधारण, प्रभाग ८ – अ) नागरिकांच्या मागासप्रवर्ग (महिला), ब) सर्वसाधारण, प्रभाग ९ – अ) अनुसूचित जाती,  ब)सर्वसाधारण (महिला), प्रभाग १० – अ) नागरिकांचा मागासप्रवर्ग, ब) सर्वसाधारण (महिला). नगरसेवक पदाच्या आरक्षणावर कोणाच्या हरकती असल्यास त्यांनी १४ ऑक्टोबर रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत सादर करावेत असे आवाहन मुख्याधिकारी हेमंत किरूळकर यांनी केले आहे.

Leave a Reply

Close Menu