आंबा, काजू बागायतदारांना वेंगुर्ल्यातून पाठींबा

हवामानातील प्रतिकूल परिस्थिती, कीडा-रोगांचा प्रादुर्भाव, वाढलेला उत्पादन खर्च, बाजारातील दरातील मोठी घसरण व अनिश्चितता यामुळे शेतकरी व व्यापारी दोन्ही घटक अडचणीत आले आहेत. या पार्श्वभूमीवर शेतकरी व व्यापारी वर्गाच्या न्याय्य मागण्यांसाठी 12 मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला. वेंगुर्ला शहरातील व्यापाऱ्यांनी आपापली दुकाने बंद ठेऊन या आंबा, काजू बागायतदारांच्या या मोर्चाला पाठींबा दर्शविला. अत्यावश्यक सेवांसहीत काही फळे, फुले तसेच पालेभाजी यांची दुकाने सुरू ठेवली होती.

Leave a Reply