कुडाळ-मालवणचे आमदार तथा शिवसेना नेते निलेश राणे यांचा वाढदिवस वेंगुर्ला येथे विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. कॅम्प येथील मैदानावर आयोजित कार्यक्रमात आमदार राणे यांनी उपस्थित राहत केक कापला. आज पक्ष, राजकारण, नेतेमंडळी आणि निष्ठा या सर्व गोष्टींकडे समाजाचा पाहण्याचा दृष्टिकोन बदलला असताना धनंजय महाजन आणि त्यांच्या स्वरेया फाऊंडेशनकडून सुरू असलेल्या कार्याचा हेवा वाटतो. या संस्थेला जिल्ह्रातील शैक्षणिक व सामाजिक कार्याला आवश्यक सर्व सहकार्य केले जाईल, असे प्रतिपादन आमदार निलेश राणे यांनी केले. त्यानंतर लाईव्ह कॉन्सर्टमध्ये सुफी संगीताचा अविस्मरणीय सोहळा रंगला. इंडियन आयडॉल विजेते सलमान अली आणि त्यांच्या टीमने आपल्या जादूई सादरीकरणाने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविले. हजारो संगीतप्रेमींच्या उपस्थितीत झालेल्या या लाईव्ह कॉन्सर्टने सांस्कृतिक इतिहासात संस्मरणीय अध्याय लिहिला. स्वरेया फाऊंडेशन आणि वेंगा बॉईज, वेंगुर्ला यांनी घेतलेल्या सिंधुरन मॅरेथॉन’ स्पर्धेत 400 स्पर्धकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. 10 किमी धावणे- 15 वर्षाखालील पुरूष गट- यश प्रकाश कोडाव, महेश फर्नांडिस, महिला- हिना आंबेरकर, हिना सारंग, 15 ते 44 पुरूष वयोगट- ओंकार चांदीवडे, आदित्य राऊळ, महिला-रेश्मा पांढरे, मेघा सातपुते, 45 ते 60 पुरूष वयोगट- प्रमोद सातपुते, कमलाकांत केरकर, 60 वयापेक्षा जास्त पुरूष गट- वि·श्वनाथ शेटये, अशोक ठोंबरे, 5 किमी धावणे – 15 वर्षाखालील पुरूष गट – आशीर्वाद सातपुते, भावेश यादव, महिला – आशू लिंगवत, साक्षी पेडणेकर, 15 ते 45 पुरूष वयोगट- ओम उन्हाळेकर, यश घोगळे, 15 ते 45 महिला वयोगट-करिश्मा राणे, सरिता गावडे, 46 ते 60 पुरूष वयोगट- सुशांत परब, सागर घाडी, 60 वर्षावरील महिला गट – डॉ.अमृता वेझरे, प्राची मणचेकर यांनी क्रमांक पटकाविले. या सर्वांना गौरविण्यात आले.
