सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेमध्ये अखेर प्रशासकीय राजवट संपून लोकनियुक्त राजवट 16 मार्चपासून सुरू झाली आहे. ही लोकनियुक्त राजवट सुरू होत असताना उत्सुकत लागूल राहिलेल्या सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या 33 व्या अध्यक्षपदी भाजपाचे बांदा जि.प.सदस्य प्रमोद कामत आणि उपाध्यक्षपदी शिंदे शिवसेनेचे पावशी जि.प.सदस्य तुकाराम उर्फ दादा साईल यांची बिनविरोध निवड झाली. जिल्हा परिषदेवर महायुतीने झेंडा फडकवला असून तब्बल 34 वर्षानंतर भाजपाचा जि.प.अध्यक्ष झाला आहे.
