ज्येष्ठ नागरिक संवाद मेळावा संपन्न

  जिल्हा पोलीस अधीक्षक मोहन दहिकर व अतिरिक्त पोलिस अधीक्षक नयोमी साटम यांच्या प्रेरणेने व मार्गदर्शनाखाली आणि माजी नगराध्यक्ष सुनिल डुबळे यांच्या अध्यक्षतेखाली 19 ऑक्टोबर रोजी सातेरी मंगल कार्यालय येथे ज्येष्ठ नागरिक संवाद मेळावा घेण्यात आला. यावेळी पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारी, उपनिरीक्षक शेखर दाभोलकर, अंमलदार, पोलीस पाटील तसेच ठाकरे शिवसेना उपतालुकाप्रमुख संजय गावडे, डॉ.जयश्री खडपकर आदी उपस्थित होते.

      यावेळी ज्येष्ठ नागरिकांच्या तक्रारी ऐकून घेऊन पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारी यांनी त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी पोलीस त्यांच्या सोबत असल्याची ग्वाही दिली. तसेच त्यांनी स्वरचित ‌‘पाखरू‌‘ ही ज्येष्ठ नागरिकांच्या जीवनावर आधारित कविता ज्येष्ठ नागरिकांना ऐकवून टाळ्यांची दाद मिळविली. पोलीस उपनिरीक्षक शेखर दाभोलकर यांनी पोलिसांची ज्येष्ठ नागरिकांप्रती असलेली तळमळ बोलून दाखवून, तुम्ही एकटे नसून सर्वच पोलीस तुमच्या सोबत असल्याचे सांगितले. सावंतवाडी येथील कपिल कांबळे यांच्या ऑर्केस्ट्रामधील सदाबहार गाण्यांनी कार्यक्रमाची रंगत अधिकच वाढली. डॉ. जयश्री खडपकर यांनी ज्येष्ठ नागरिकांची आरोग्य तपासणी करून औषधे दिली. वाहतूक पोलीस अंमलदार मनोज परूळेकर यांनी सूत्रसंचालन व आभार मानले. पोलीस जयेश सरमळकर यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले.

Leave a Reply