टांककर-शेटये ट्रस्ट रूग्णवाहिकेचे लोकार्पण

टांककर-शेटये ट्रस्टच्या सौजन्याने शिरोडा, आरवली, रेडी परिसरातील रूग्णसेवेसाठी उपलब्ध करून दिलेल्या रूग्णवाहिकेचे लोकार्पण आरवली येथील पणशीकर मंगल कार्यालय येथे सिंधुदुर्गच्या अतिरिक्त जिल्हाधिकारी शुभांगी साठे यांच्या हस्ते झाले. यावेळी तहसीलदार ओंकार ओतारी, टांककर-शेटये ट्रस्टचे अध्यक्ष जनार्दन शेटये, सामाजिक कार्यकर्ते सचिन वालावलकर, बाबल गावडे, जि.प.सदस्य प्रितेश राऊळ, शिरोडा ऑटो रिक्षा संघटनेचे संजय गडेकर यांच्यासह बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.
            टांककर-शेटये ट्रस्टच्या माध्यमातून ट्रस्ट अध्यक्ष हे जनसेवेसाठी अनेक उपक्रम गेल्या काही वर्षात राबवित आहेत. विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रोत्साहन, आपत्तीत सापडलेल्यांना आर्थिक मदतही केली आहे. कोरोना काळात या भागात रूग्णवाहिका नसल्याने अनेकांना प्राण गमवावे लागले. तसे पुन्हा या भागात घडू नये, यासाठी या ट्रस्टने दिलेल्या रूग्णवाहिकेचा लाभ सर्वांना व्हावा यादृष्टीने शिरोडा ऑटोरिक्षा चालक-मालक संघटनेने काम पहावे असे आवाहन अतिरिक्त जिल्हाधिकारी शुभांगी साठे यांनी केले. ट्रस्टचे अध्यक्ष जनार्दन शेटये यांनी उपस्थितांचे स्वागत केले.

Leave a Reply