टीबीमुक्त गाव म्हणून अणसूर गावचा सन्मान

टीबीमुक्त गाव म्हणून सिंधुदुर्ग जिल्हास्तरावर सिल्वर मेडल मिळवून अणसूर गावची यापूर्वी तालुका आणि आता जिल्हास्तरावर अशी दोन वेळा निवड झाल आहे. यानिमित्त पंचायत समिती गटविकास अधिकारी दिनेश पाटकर यांच्या हस्ते  अणसूर ग्रामपंचायतीला गौरविण्यात आले. यावेळी सरपंच सत्यविजय गावडे, उपसरपंच वैभवी मालवणकर, सदस्य, सीमा गावडे, संयमी गावडे, प्रज्ञा गावडे, सुधाकर गावडे, आरोग्य विभागाच्या डॉ.धुरी, अधिकारी, कर्मचारी ग्रामअधिकारी सातोसे, आशा सेविका अनुष्का तेंडोलकर आदी उपस्थित होते.

 

Leave a Reply