पं. स.सभापतीपदी शंकर घारे तर उपसभापतीपदी सचिन देसाई

वेंगुर्ला पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापती पदाची निवडणूक 9 मार्च रोजी पंचायत समितीच्या सभागृहात घेण्यात आली. तत्पूर्वी वेंगुर्ला भाजपाच्या कार्यालयात झालेल्या महायुतीच्या सभेत भाजपा तालुकाध्यक्ष पपू परब यांनी सभापती पदासाठी मातोंड पंचायत समिती सदस्य शंकर घारे यांचे तर शिंदेसेनेचे जिल्हा समन्वयक सचिन वालवलकर यांनी उपसभापती पदासाठी परूळे पंचायत समिती सदस्य सचिन देसाई यांचे नाव जाहीर केले. त्यानंतर या दोन्ही उमेदवारांनी आपापले नामनिर्देशन पत्रे निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे सादर केली. नामनिर्देशन पत्रे सादर करण्याच्या मुदतीत अन्य कोणाचेही उमेदवारी अर्ज न आल्याने आणि शंकर घारे तसेच सचिन देसाई यांचे उमदेवारी अर्ज वैध ठरल्याने निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार ओंकार ओतारी यांनी दोघांचीही बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले.
          यावेळी गटविकास अधिकारी वासुदेव नाईक आणि सहाय्यक गटविकास अधिकारी दिनेश पाटकर उपस्थित होते. या निवडीनंतर  बाळू देसाई, पपू परब,  सचिन वालावलकर,  पं.स.सदस्य विष्णू फणसेकर, नितीन मांजरेकर, शितल राऊत, संकेत धुरी, सुचिता वजराटकर, साक्षी नार्वेकर, प्रियांका घाटवळ, योगिता परब यांसह पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी नवनिर्वाचित सभापती घारे तसेच उपसभापती देसाई यांचे पुष्पहार घालून अभिनंदन केले.

Leave a Reply