प्रसिद्ध साहित्यिक डॉ.सौ.स्नेहा समीर राणे यांच्या “बाळभूक’ या पहिल्या मराठी कादंबरीचे प्रकाशन अलिकडेच मुंबई येथे मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कवी अरूण म्हात्रे, कामगार नेते सुधाकर अपराज, दै. “पुण्यनगरी’चे संपादक विशाल राजे, मधू कांबळे, मुंबई पोर्ट प्राधिकरणाचे ट्रस्टी नलावडे आदी उपस्थित होते. स्वागत स्नेहा राणे यांनी, सूत्रसंचालन पूजा काळे यांनी तर आभार समीर राणे यांनी मानले. यावेळी घेण्यात आलेल्या लकी ड्रॉमधील 65 प्रेक्षकांना “बाळभूक’ कादंबरीचे वितरण करण्यात आले.
