मच्छीमारांसाठी ‘मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजना‘

वेंगुर्ला येथील साई मंगल कार्यालयात भाजपाच्यावतीने मच्छीमार मेळावा घेण्यात आला. यावेळी बंदर व मत्स्य विकास मंत्री तथा पालकमंत्री नितेश राणे, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, माजी नगराध्यक्ष राजन गिरप, तालुकाध्यक्ष पप्पू परब, आधुनिक रापण मच्छीमार संघ सिंधुदुर्ग अध्यक्ष दादा केळुस्कर, मच्छीमार सेल जिल्हा संयोजक वसंत तांडेल, मच्छीमार दादा मोटे, मत्स्य विकास विभागाचे आयुक्त सागर कुवेसकर उपस्थित होते.

     प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्रातील मच्छीमारांसाठी येत्या जानेवारीपासून राज्यात ‘मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजना‘ आणतोय. या योजनेसह वेगवेगळ्या २६ योजना पण टप्प्याटप्प्याने सुरू करणार आहोत. यामुळे अनेक फायदे मच्छीमारांना होणार असून मच्छीमारांच्या जीवनमानामध्ये आमुलाग्र बदल करण्याचा, त्यांच्या आयुष्यामध्ये परिवर्तन घडवून आणण्यासाठी आणि त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी आमचे प्रयत्न आहेत, अशी माहिती नितेश राणे यांनी दिली.

       शेतक­-यांप्रमाणे मच्छीमारांनाही नुकसान झाल्यावर नुकसान भरपाई मिळावी म्हणून १०० टक्के कृषीचा दर्जा मच्छीमारीला दिला आहे व देशातील असे करणारे हे एकमेव महाराष्ट्र राज्य आहे. त्यामुळे आता मच्छीमारांना विजेमध्ये सवलतही मिळू शकते. त्यासाठी मत्स्य आयुक्त सागर कुवेस्कर यांच्याकडे मागणी करा असे आवाहन मंत्री राणे यांनी केले. सूत्रसंचालन दाजी जुवाटकर यांनी तर प्रास्ताविक आणि आभार वसंत तांडेल यांनी केले.

Leave a Reply