रक्तदान शिबिरात ६२ दात्यांचे रक्तदान

वेताळ प्रतिष्ठान, सिंधुदुर्ग-तुळस यांच्यावतीने, कोकण कला व शिक्षण विकास संस्था आणि ग्रा.पं. तुळस यांच्या संयुक्त विद्यमाने पार्वतीदेवी वाचनालयाच्या सभागृहात आयोजित केलेल्या  ३३व्या रक्तदान शिबिरात ६२ जणांनी रक्तदान केले. उद्घाटन भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना देसाई यांच्या हस्ते झाले. यावेळी सरपंच रश्मी परब, उपसरपंच सचिन नाईक, मकरंद पाटणकर, कोकण कला व शिक्षण विकास संस्थेचे प्रथमेश सावंत, ग्रा.पं.सदस्य जयवंत तुळसकर व दादा ठुंबरे, सामाजिक कार्यकर्ते नारायण नागवेकर व सुजाता पडवळविवेक तिरोडकर आदी उपस्थित होते. २० पेक्षा जास्तवेळा रक्तदान केलेल्या २५ रक्तदात्यांचा कोकण कला व शिक्षण विकास संस्थेतर्फे सन्मान करण्यात आला. सूत्रसंचालन डॉ. सचिन परूळकर यांनी तर आभार माधव तुळसकर यांनी मानले. शिबिर यशस्वीतेसाठी महेश राऊळ, सदगुरू सावंत, प्रसाद भणगे, मंगेश सावंत, रोहित गडेकर, विधी नाईक, सानिया वराडकर, सुधीर चुडजी, प्रदीप परूळकर, वैष्णवी परूळकर, भक्ती भणगे, सुधीर चुडजी, रोहन राऊळ, नाना राऊळ, यशवंत राऊळ, प्रज्वल परूळकर, अनिल परूळकर, समर्थ तुळसकर आदींनी मेहनत घेतली.

 

Leave a Reply