बॅ.खर्डेकर महाविद्यालयातील द्वितीय वर्ष विज्ञान शाखेची विद्यार्थीनी कु.सबा शेख हिची महाराष्ट्र राज्य अंतरविद्यापिठ (अश्वमेध) बॅडमिंटन स्पर्धेसाठी मुंबई विद्यापिठ संघात निवड झाली आहे. ही स्पर्धा स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापिठ, नांदेड येथे होणार आहे. यापूर्वी कु.सबा हिने सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड बॅडमिंटन संघाचे नेतृत्व करत उल्लेखनीय कामगिरी बजाविली असून मुंबई विद्यापिठाचे ब्रााँझ मेडल पटकाविले आहे. महाविद्यालयातील जिमखाना विभागाच्या मार्गदर्शनाखाली तिने आवश्यक तांत्रिक कौशल्ये आत्मसात केली असून, ती दमदार कामगिरी करण्यास सज्ज आहे. सबा हिला शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव प्रा.जयकुमार देसाई, पेट्रन कौन्सिल मेंबर दौलतराव देसाई, चेअरमन मंजिरी मोरे-देसाई, प्रशासन अधिकारी पृथ्वी मोरे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. तसेच प्राचार्य डॉ.धनराज गोस्वामी, क्रीडा संचालक प्रा.जे.वाय.नाईक, जिमखाना चेअरमन डॉ.के.आर.कांबळे, संस्था प्रतिनिधी सुरेंद्र चव्हाण, प्रा.संजय चमणकर, प्रा.सुदाम माने यांसह प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचा¬यांनी तिचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.
