वेंगुर्ला पंचायत समिती मासिक सभा सभापती शंकर घारे यांच्या अध्यक्षतेखाली आणि उपसभापती सचिन देसाई, सदस्य विष्णू फणसेकर, नितीन मांजरेकर, संकेत धुरी, सुचिता वजराटकर, साक्षी नार्वेकर, प्रियांका घाटवळ, योगिता परब, शितल राऊत यांच्यासह गटविकास अधिकारी वासुदेव नाईक, सहाय्यक गटविकास अधिकारी दिनेश पाटकर, गटशिक्षणाधिकारी संतोष गोसावी यांच्यासह अन्य खात्यांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत संपन्न झाली. गटविकास अधिकारी यांनी सर्वांचे स्वागत करून पंचायत समिती प्रशासकीय कारभारापासूनचा आजपर्यंतचा कार्य अहवाल सादर केला. या चार वर्षात पंचायत समिती स्तरावर विविध कामांसाठी 61 ठराव घेण्यात आले होते. या ठारावांना सभागृहाची मान्यता घेण्यात आली. तालुक्यात 129 प्राथमिक व 16 माध्यमिक शाळांच्या गुणवत्ता व भौतिक विकासासाठी वर्षभरात योग्य ते नियोजन करण्याचे ठरविण्यात आले. मुलांना स्पर्धा परीक्षांचा अधिक सराव व्हावा, यासाठी खास प्रयत्न करण्यासोबतच शिक्षकांचे समायोजन योग्य पद्धतीने करण्याचाही निर्णय घेण्यात आला. तालुक्यात वीज पुरवठा सुरळीत नसतानाही विद्युत मंडळाचे अधिकारी ‘मार्च एंडिंग’च्या नावाखाली सध्या गावागावात थकित ग्राहकांना सतावत आहेत. तालुक्यातील अनेक घरांमध्ये परवानगी न घेताच स्मार्ट मीटर सक्तीने बसविले जात आहेत. वेंगुर्ला कार्यालयात येणाऱ्या ग्राहकांना योग्य वागणूक दिलीच जात नाही. सभाशास्त्राचेही पालन होत नाही, असा गंभीर आरोप विद्युत मंडळाबाबत करण्यात आल्या. शहरातील ठिकठिकाणची अतिक्रमणे व वाहनांचे बेशिस्त पार्किंग एसटी वाहतूकीला त्रासदायक ठरत आहे. याबाबत वेंगुर्ला न.प.आणि पोलिस स्टेशन यांच्याशी पत्रव्यवहार करण्याचे ठरविण्यात आले. सभापती घारे यांनी पं.स.सभागृहाला बॅ.नाथ पै यांचे नाव देणे, पं.स.कार्यालयाच्या आवाराला कंपाऊंड ऑल बांधण्यासाठी प्रस्ताव तयार करणे, आवारात वाहनतळ उभारणे, जुनी इमारत सुस्थितीत ठेवण्यासाठी काळजी घेणे व कॅन्टींनची व्यवस्था करण्याबाबत कार्यवाही करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या.विद्युत मंडळाच्या कारभारावर तीव्र नाराजी
वेंगुर्ला पंचायत समिती मासिक सभा सभापती शंकर घारे यांच्या अध्यक्षतेखाली आणि उपसभापती सचिन देसाई, सदस्य विष्णू फणसेकर, नितीन मांजरेकर, संकेत धुरी, सुचिता वजराटकर, साक्षी नार्वेकर, प्रियांका घाटवळ, योगिता परब, शितल राऊत यांच्यासह गटविकास अधिकारी वासुदेव नाईक, सहाय्यक गटविकास अधिकारी दिनेश पाटकर, गटशिक्षणाधिकारी संतोष गोसावी यांच्यासह अन्य खात्यांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत संपन्न झाली. गटविकास अधिकारी यांनी सर्वांचे स्वागत करून पंचायत समिती प्रशासकीय कारभारापासूनचा आजपर्यंतचा कार्य अहवाल सादर केला. या चार वर्षात पंचायत समिती स्तरावर विविध कामांसाठी 61 ठराव घेण्यात आले होते. या ठारावांना सभागृहाची मान्यता घेण्यात आली. तालुक्यात 129 प्राथमिक व 16 माध्यमिक शाळांच्या गुणवत्ता व भौतिक विकासासाठी वर्षभरात योग्य ते नियोजन करण्याचे ठरविण्यात आले. मुलांना स्पर्धा परीक्षांचा अधिक सराव व्हावा, यासाठी खास प्रयत्न करण्यासोबतच शिक्षकांचे समायोजन योग्य पद्धतीने करण्याचाही निर्णय घेण्यात आला. तालुक्यात वीज पुरवठा सुरळीत नसतानाही विद्युत मंडळाचे अधिकारी ‘मार्च एंडिंग’च्या नावाखाली सध्या गावागावात थकित ग्राहकांना सतावत आहेत. तालुक्यातील अनेक घरांमध्ये परवानगी न घेताच स्मार्ट मीटर सक्तीने बसविले जात आहेत. वेंगुर्ला कार्यालयात येणाऱ्या ग्राहकांना योग्य वागणूक दिलीच जात नाही. सभाशास्त्राचेही पालन होत नाही, असा गंभीर आरोप विद्युत मंडळाबाबत करण्यात आल्या. शहरातील ठिकठिकाणची अतिक्रमणे व वाहनांचे बेशिस्त पार्किंग एसटी वाहतूकीला त्रासदायक ठरत आहे. याबाबत वेंगुर्ला न.प.आणि पोलिस स्टेशन यांच्याशी पत्रव्यवहार करण्याचे ठरविण्यात आले. सभापती घारे यांनी पं.स.सभागृहाला बॅ.नाथ पै यांचे नाव देणे, पं.स.कार्यालयाच्या आवाराला कंपाऊंड ऑल बांधण्यासाठी प्रस्ताव तयार करणे, आवारात वाहनतळ उभारणे, जुनी इमारत सुस्थितीत ठेवण्यासाठी काळजी घेणे व कॅन्टींनची व्यवस्था करण्याबाबत कार्यवाही करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या.