वेंगुर्ला आगारास नवीन पाच बसेस प्राप्त

वेंगुर्ला आगारातील एसटी बससे जुन्या झाल्याने लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी एसटी पाठविताना नियत्रकांना तारेवरची कसरत करावी लागत होती. त्यामुळे आगाराला नवीन बसेस मिळाव्यात, अशी मागणी ठाकरे शिवसेनेच्या एसटी कामगार सेनेतर्फे मातोंडचे सुपुत्र असलेले माहिम मतदारसंघाचे आमदार महेश सावंत यांच्या करण्यात आली होती. त्यानुसार महिन्याभरातच वेंगुर्ला आगाराला नव्या को­या पाच एसटी  बसेस मिळवून देऊन आमदार महेश सावंत यांनी आपला शब्द पाळला आहे. प्राप्त झालेल्या नव्या एसटी बसेसचा शुभारंभ आगार व्यवस्थापक राहूल कुंभार व संघटनेच्या पदाधिका­यांच्या उपस्थितीत करण्यात आला.

     यावेळी ठाकरे सेनेचे सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ प्रमुख रूपेश राऊळ, माजी नगराध्यक्ष संदेश निकम, माजी शहरप्रमुख अजित राऊळ, तालुका युवासेना अधिकारी पंकज शिरसाट, ठाकरे सेना एसटी कामगार सेना जिल्हाध्यक्ष अनुप नाईक, पदाधिकारी शैलेश कासार, शैलेश परूळेकर, संदिप केळजी, गजानन गोलतकर, सुजित चमणकर, संदिप पेडणेकर, मकरंद गोंधळेकर, दिलीप राणे, अशोक धुरी, प्रशांत बुगडे, रोहन मल्हार, आर्यन राऊळ आदी उपस्थित होते. वेंगुर्ला आगारास लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी डिझेलच्या दहा गाड्यांची आवश्यकता होती. मात्र जून महिन्याच्या सुरूवातीलाच आमदार महेश सावंत यांनी पाच गाड्या मिळवून दिल्या आहेत. वेंगुर्ल्यातील प्रवाशांच्यावतीने आम्ही त्यांचे आभार मानत आहोत, असे यावेळी संदेश निकम म्हणाले.

Leave a Reply