वेंगुर्ल्यात ‘ऑक्सिजन बँक‘चे लोकार्पण

वेंगुर्ला तालुक्यात माझा वेंगुर्ला‘  व  वेंगुर्ला मेडिकल असोसिएशन

यांच्या संयुक्त विद्यमान लोक सहभागातून आम्ही वेंगुर्लेकर‘ सक्षम अभियान हाती घेण्यात आलेले असून या अभियानाचा एक भाग म्हणून कोविड रुग्णांसाठी दोन जम्बो ऑक्सिजन सिलिडर व 2 मिनी ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर असलेल्या ऑक्सिजन बँकचे वेंगुर्ला नगरपरिषदेच्या ठिकाणी लोकार्पण करण्यात आले.

      सदर ऑक्सिजन सिलिडर हे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार रुग्णांना घरी किवा रुग्णालयात तातडीच्या उपचारासाठी दिले जाणार आहेत. ज्या व्यक्तीसाठी वापर केला जाणार आहेत्या व्यक्तींच्या कुटुंबियांनी वापरानंतर सदर सिलिडरसाठीची फी न देता तो भरुन देण्यासाठीची विनंती करण्यात आली आहे. यावेळी मुख्याधिकारी डॉ.अमितकुमार सोंडगेनगराध्यक्ष दिलीप गिरप, ‘माझा वेंगुर्ला‘ ग्रुपचे निलेश चेंदवणकरमोहन होडावडेकरसचिन वालावलकरराजन गावडेसंजय पुनाळेकरप्रसन्ना देसाईनगरसेवक सुहास गवंडळकरविधाता सावंतप्रशांत आपटेवेंगुर्ला तालुका व्यापारी संघाचे अध्यक्ष व मेडिकल असोसिएशनचे विवेक खानोलकरडॉ.राजेश्वर उबाळेडॉ.अतुल मुळेगणेश अंधारीकपिल पोकळेवसंत तांडेलखेमराज कुबल आदी उपस्थित होते.

Leave a Reply