
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेले काही महिने सतत प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन स्वःताचा जीव धोक्यात घालून कोरोना संबंधित कामे सातत्याने काम करत असणा-या वेंगुर्ला तालुक्यातील सर्व आशा स्वयंसेविकांना अन्नधान्य वाटप करण्याच्या शिवसेनेतर्फे घेतलेल्या निर्णयानुसार तुळस, मातोंड, आसोली, उभादांडा, पेंडूर, परबवाडा, दाभोली, वजराट, होडावडा या भागातील ४५ आशा स्वयंसेविकांना वेंगुर्ला शाखा येथे सावंतवाडी मतदार संघ प्रमुख विक्रांत सावंत व महिला आघाडी जिल्हाप्रमुख जान्हवी सावंत यांच्या माध्यमातून धान्यवाटप करण्यात आले.
यावेळी तालुकाप्रमुख बाळू परब, जिल्हा महिला आघाडी प्रमुख जान्हवी सावंत, उपजिल्हाप्रमुख बाळा दळवी, शहरप्रमुख अजित राऊळ, उपजिल्हाप्रमुख सुनिल डुबळे, महिला आघाडीप्रमुख सुकन्या नरसुले, नगरसेविका सुमन निकम, सचिल वालावलकर, महिला शहर आघाडी प्रमुख मंजूषा आरोलकर, दाभोलीच्या माजी सरपंच मनाली हळदणकर, नम्रत बोवलेकर, कार्मिस आल्मेडा, निलेश कुडतरकर, युवासेना, महिला आघाडी, शिवसेना पदाधिकारी, तालुक्यातील आशा स्वयंसेविका आदी उपस्थित होते.

उत्तम प्रकारे काम करणारे अनेक जण आहेत
आनंद वाटला