शिक्षक दिनानिमित्त ज्येष्ठ शिक्षकांचा सत्कार

शिक्षक दिनाच्या निमित्ताने रोटरी क्लब ऑफ वेंगुर्ला मिडटाऊनचे सेक्रेटरी योगेश नाईक यांच्या हस्ते सिंधुदुर्गच्या क्रीडा क्षेत्रात गेली ३० वर्षे सातत्याने कार्यरत असलेल्या वेंगुर्ला हायस्कूलचे निवृत्त क्रीडा शिक्षक जयराम वायंगणकर यांचा क्रीडाक्षेत्रातील भरीव योगदानाबद्दल तर शाळा वेंगुर्ल नं १ च्या सेवाज्येष्ठकार्यतत्पर आणि अभ्यासू शिक्षिका गायत्री बागायतकर यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील भरीव योगदानाबद्दल रोटरी क्लब ऑफ वेंगुर्ला मिडटाऊनच्यावतीने त्यांच्या घरी जाऊन शालश्रीफळसन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

      यावेळी रोटरी असिस्टंट गव्हर्नर संजय पुनाळेकरडिस्ट्रिक्टसेक्रेटरी राजेश घाटवळक्लब व्हाईस प्रेसिडेंट अॅड.प्रथमेश नाईकइव्हेंट चेअरमन आनंद बोवलेकरट्रेझरर पंकज शिरसाटस्पोर्टस डायरेक्टर मुकुल सातार्डेकर आदी उपस्थित होते.

Leave a Reply