शिवप्रेमी मंडळातर्फे शिवजयंती उत्साहात

माणिकचौक येथील शिवप्रेमी मित्रमंडळातर्फे छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त दोन दिवस विविध सांस्कृतिक कार्यक्रम आणि सत्कार समारंभ आयोजित केले होते. वेशभूषा स्पर्धेत आद्या खापरे, अंतरा आडेलकर आणि भूरे यांनी अनुक्रमे प्रथम तीन तर आयुष बागायतकर व सोनाक्षी बागायतकर यांनी उत्तेजनार्थ क्रमांक पटकाविले. दोन गटात रेकॉर्ड डान्स स्पर्धा घेण्यात आली. मोठ¬ा गटात प्रथम-दूर्वा पावसकर व नंदिनी बिले, द्वितीय-निरजा माडकर व वैष्णवी मुणनकर, तृतीय – पूर्वा मेस्त्री व भास्कर सांगळे, लहान गटात प्रथम-चैत्रा चव्हाण व वेलांकनी गोम्स, द्वितीय-वेदश्री दाभोलकर याने तर गंश परब याने तृतीय क्रमांक पटकाविले. सर्व विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. याच कार्यक्रमात नगराध्यक्ष दिलीप गिरप, नगरसेवक अॅड.सुषमा प्रभूखानोलकर, उभादांडा जिल्हापरिषद सदस्य संजय गावडे, भाजपाच्या महिला जिल्हाध्यक्ष वृंदा गवंडळकर तसेच दिव्यांग क्रिकेट स्पर्धेत चमकदार कामगिरी करणाऱ्या स्मिता गावडे यांचा शिवप्रेमी मित्रमंडळाच्यावतीने सत्कार करण्यात आला. यावेळी नगरसेवक आकांक्षा परब, मयुरी केरकर, शितल आंगचेकर, काजल कुबल, माजी नगरसेवक साक्षी पेडणेकर, साहस प्रतिष्ठानच्या अध्यक्ष रूपाली पाटील, जबरदस्त मित्रमंडळाचे सदस्य ज्ञाने·श्वर रेडकर व स्वप्निल पालकर, सामाजिक कार्यकर्ते भूषण आंगचेकर, हेमंत गावडे, वैभव होडावडेकर, होडावडा माजी सरपंच अदिती नाईक यांनी कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या.

सत्कार समारंभाप्रसंगी शिवप्रेमी मित्रमंडळाचे अध्यक्ष रोहित वेंगुर्लेकर, उपाध्यक्ष नितीश कुडतरकर, खजिनदार प्रथमेश यंदे, मंडळाचे ज्येष्ठ कार्यकर्ते विनय गोगटे, प्रमोद यंदे, सचिन करंगुटकर, श्रीनिवास सौदागर, महादेव मेस्त्री, विनोद लोणे, रेकॉर्ड डान्स स्पर्धेचे परीक्षक तुळशीदास आर्लेकर, वेशभूषा स्पर्धेच्या परीक्षक मयुरी माडकर, किल्ले स्पर्धेचे परीक्षक मयुर पवार व प्रज्वल कोयंडे, शेणई बालवाडीच्या संचालिका आनंदी करंगुटकर, उभादांडा पोलिस पाटील शिवन्या चिचकर, शुभ्रा शिवलकर, अनिकेत ताम्हणकर, रूपेश अणसूरकर, सौ.सडवेलकर, सुहास मेस्त्री, अनिल आडेलकर, ओजस परब, उमेश मडकईकर, भानूदास मांजरेकर, गुड्डू तांडेल आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन बाबूराव खडपकर यांनी केले.

Leave a Reply