शॉर्ट टर्म कोर्सेसचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाइन उद्घाटन

  कृषीभूषण आबासाहेब उर्फ रमाकांत मुकुंद कुबल शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) वेंगुर्ला या संस्थेमध्ये शॉर्ट टर्म कोर्सेसचे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आभासी उपस्थितीत तसेच कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून ऑनलाईन पद्धतीने उद्घाटन समारंभ दिमाखात पार पडला.

      या शॉर्टटर्म कोर्सेसच्या प्रशिक्षणामुळे प्रशिक्षीत उमेदवारांना रोजगारांच्या भरपूर संधी उपलब्ध होतील असा आशावाद पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंपत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या ऑनलाईन उद्घाटनपर संबोधनात व्यक्त केला. तर कॅम्प येथील संस्थेच्या सभागृहातील शॉर्ट टर्म क्लास रूमचे उद्घाटन नायब तहसिलदार राजन गवस यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमास मुख्य अतिथी म्हणून विश्वकर्मा प्रशिक्षण योजनेचे लाभाथ किशोर गावडे हे उपस्थित होते. तसेच ऑनलाईन उद्घाटन कार्यक्रमास नायब तहसिलदार राजन गवस, सामाजिक कार्यकर्ते प्रसन्ना देसाई, पंचायत समिती कार्यालयाचे श्री.मांजरेकर, महिला काथ्या कारखानाच्या संचालिका प्रज्ञा परब, या संस्थेतील आयएमसीचे मंत्री महोदय नामनिर्देशित सदस्य विनायक खवणेकर आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

      संस्थेचे आयएमसी सचिव तथा प्रभारी प्राचार्य जगदीश गवस यांनी स्वागत केले. आपल्या प्रास्ताविकपर मनोगतात श्री. गवस यांनी संस्थेत सुरु होणाऱ्या शॉर्ट टर्म कर्सेस बाबतची माहिती दिली. तसेच उपस्थित सर्व मान्यवारांना शॉर्ट टर्म कोर्सच्या प्रवेशासाठी स्थानिक इच्छूक उमेदवारांना प्रवेश घेण्यासाठी या संस्थेत संपर्क साधावा असे आवाहन केले.

      कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्थेतील ज्येष्ठ निदेशक जे. डी. डिसिल्वा यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी संस्थेतील ज्येष्ठ निदेशक प्रसाद कोदे, सारीका साबळे, सोनाली लिखारे, नंदकुमार नरतवडेकर, देवेश सावंत, अर्जुन गवस, लक्ष्मण नाईक, बाळकृष्ण मेस्त्री यांनी विशेष परिश्रम घेतले. आभार प्रदर्शन संस्थेतील ज्येष्ठ निदेशक संदीप धुरी यांनी केले. या संस्थेतील शॉर्ट टर्म कोर्सच्या प्रवेशासाठी समन्वयक म्हणून संदीप धुरी व सारीका साबळे काम पाहतील.

Leave a Reply