समृद्धी पिळणकर यांना पुरस्कार प्रदान

वात्सल्य सामाजिक संस्था व निर्धार न्यूज  लोकसेवा फाऊंडेशन, महाराष्ट्र आयोजित मराठी राजभाषा दिन व छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचे औचित्य साधून कुडाळ येथे छत्रपती शिवराय संमेलन २०२३ संपन्न झाले. या कार्यक्रमात रा.कृ.पाटकर हायस्कुलच्या उपक्रमशिल शिक्षिका समृद्धी संजय पिळणकर-मुणनकर यांना राष्ट्रीय  लोकसेवा शैक्षणिक सेवारत्न सन्मान २०२३हा पुरस्कार परशुराम गंगावणे यांच्या हस्ते देण्यात आला. यावेळी ज्येष्ठ समाजसेविका कमलताई परुळेकर, राष्ट्रीय पंच महेश दाभोलकर, कोकणसादचे उपसंपादक प्रा.रुपेश पाटील, वात्सल्यच्या अध्यक्ष नेहा परब, प्रा.डॉ.बी.एन.खरात, प्रा.वैभव खानोलकर उपस्थित होते.

Leave a Reply