सोल्जरॅथॉनमधून अनोखे सॅल्यूट 

गेल इंडिया प्रा.लि.आणि फिस्टिस्तानतर्फे भारतभर भारतीय सैन्य दलाचा विजय दिन साजरा करण्यात आला. १७ डिसेंबर रोजी घेतलेल्या सोल्जरॅथॉन मॅरेथॉन स्पर्धेत ५० जणांनी सहभाग घेऊन शहिद झालेल्या व जखमी झालेल्या जवानांच्या कुटुंबियांना सॅल्यूट करण्यात आला. तर वेंगुर्लावासीयांनी यात सहभागी होऊन त्यांच्या कुटुंबियांना मदत केली.  स्पर्धेसाठी फिटीस्तानने नेमलेल्या कॅप्टन प्रदिप वेंगुर्लेकर, अँबेसीडर संतोष पेडणेकर, मार्गदर्शन डॉ.प्रल्हाद मणचेकर यांचा पदक देऊन कंपनीतर्फे विशेष सत्कार तर प्रमुख पाहुणे सिधुदुर्गातील अल्ट्रा रनर व मार्गदर्शक डॉ.प्रशांत मडव, भारतातील ख्यातनाम अल्ट्रा रनर ओंकार पराडकर यांचा पदक व माजी लष्करप्रमुख वि.के.सिग यांच्या सहीचे प्रमाणपत्र देऊन सत्कार तर सातत्याने स्वतः चालत फिरून समाजाला संदेश देणारे अशोक ठोंबरे यांना मानपत्र देण्यात आले. मानपत्राचे वाचन डॉ.नामदेव मोरे यांनी केले. याप्रसंगी व्ही.एफ.एफचे मोहन होडावडेकर, कविता भाटीया यांच्यासह रनर उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी डॉ.अमेय खानोलकर, डॉ.आर.एम.परब, प्रा.अरविद बिराजदार, लाडू जाधव, डॉ. अश्विनी माईणकर, प्रा.प्रदिप प्रभू, प्रा.पाटोळे व वेंगुर्ला फिटनेस फायटरच्या सभासदांनी मेहनत घेतली.

Leave a Reply