२७ कोटी ४६ लाख ९७ हजार ७६ रक्कमेच्या शिलकी अर्थसंकल्पास मंजूरी

      वेंगुर्ला न.प.च्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात नगराध्यक्ष दिलीप गिरप यांच्या अध्यक्षतेखाली अर्थसंकल्प सादर केला. यावेळी उपनगराध्यक्ष अस्मिता राऊळ, नगरसेवक विधाता सावंत, सुहास गवंडळकर, प्रशांत आपटे, नागेश गावडे, प्रकाश डिचोलकर, धर्मराज कांबळी, शीतल आंगचेकर, कृतिका कुबल, कृपा गिरप, श्रेया मयेकर, स्नेहल खोबरेकर, साक्षी पेडणेकर, मुख्याधिकारी डॉ.अमितकुमार सोंडगे, प्रशासकीय अधिकारी संगीता कुबल तसेच विविध खात्याचे अधिकारी उपस्थित होते.

    कोणतीही कर वाढ न करता आजचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. या अर्थसंकल्पाचे वाचन लेखापाल श्री. परब यांनी केले. यावेळी एकूण महसूली जमा १२ कोटी ७० लाख ६५ हजार ८०० रुपये असून एकूण महसुली खर्च १७ कोटी २८ लाख १०० रुपये झाला आहे. तर भांडवली जमा ५९ कोटी ३२ लाख ५४ हजार २०० रुपये असून एकूण भांडवली खर्च ४७ कोटी ९७ लाख ५८ हजार ७०० रुपये झाला आहे. एकूण ९२ कोटी ७२ लाख ५५ हजार ८७६ रुपये जमा मधून एकूण खर्च ६५ कोटी २५ लाख ५८ हजार ८०० रुपये झाला असून २७ कोटी ४६ लाख ९७ हजार ७६ रुपये शिल्लक राहिले आहेत. या शिलकी रकमेच्या अर्थसंकल्पाला सर्वानुमते मंजुरी दिली.     

         अर्थसंकल्पावर चर्चा करताना प्रशांत आपटे यांनी स्वागत, भूमिपूजन, संदेश यासाठी तरतूद करण्यात आलेला ३ लाखाच्या निधीत वाढ करुन ती ५ लाखापर्यंत करावी अशी सूचना केली. तसेच साथीच्या रोगावर उपाययोजनेच्या रकमेत वाढ करण्याची मागणी केली. विधाता सावंत यांनी शहरात विविध प्रदर्शने, बैठका, सर्कस अशा माध्यमातून त्यांच्याकडून दिवसाला कमीत कमी १०० रुपये एवढा कर वसूल करण्यात यावा. मात्र, यात धार्मिक कार्यक्रम वगळण्यात यावे अशी मागणी केली. तसेच शासकीय जागेत जाहिरात करणा-या कंपन्याकडून कर वसूल करा अशी मागणी केली. शहरात विद्युत दिवाबत्तीसाठी वापरण्यात आलेल्या एलइडीमुळे न.प.चा खर्च कमी झाला. तसेच अर्थसंकल्प अगदी सोप्या पद्धतीने सादर केल्याबद्दल लेखापाल व त्यांना मदत केलेल्या सर्वांचे अभिनंदन करण्यात आले.

Leave a Reply