पर्यावरणदिनी वायंगणी येथे कासवमित्रांचा सन्मान

        जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून भाजपा किसान मोर्चा-सिधुदुर्गतर्फे कासव संवर्धनासाठी अतुलनीय योगदान देणा-या वायंगणी येथील सहा कासवमित्रांचा सन्मान करण्यात आला. यात सुहास तोरसकरप्रकाश साळगांवकरसंतोष साळगांवकरगौरेश खडपकरचंद्रशेखर तोरसकरप्रकाश सागवेकर या कासवमित्रांचा समावेश आहे. कासवमित्रांच्या परिश्रमांमुळे जैवविविधतेचे संरक्षण शक्य झाले असून निसर्गाची शाश्वत जपणूक घडविण्यात ते मोलाचा वाटा उचलत असल्याचे प्रतिपादन किसान मोर्चा जिल्हा सरचिटणीस गुरूनाथ पाटील यांनी केले. यावेळी भाजपाचे प्रसन्ना देसाईराजू राऊळवसंत तांडेलदादा केळुसकरवैभव शेणईबापू पंडितआनंद गावडेओंकार चव्हाणप्रशांत खानोलकरवायंगणी उपसरपंच रविद्र धोंडसदस्य अनंत केळजीविद्या गवेकरराखी धोंडसविता परबदाभोली ग्रामपंचायत सदस्य अवधूत राऊत यांच्यासह शेखर येरागीसुनिल खोबरेकरसंजय येरागीरमेश खोबरेकरनरहरी तोरसकरसचिन खडपकरजयेंद्र येरागीहरिश्चंद्र म्हाकलेघनःश्याम तोरसकरप्रदिप म्हाकलेरितेश म्हाकलेभालचंद्र तोरस्करप्रसाद पेडणेकरउमेश सारंगविनायक कामतसूर्यकांत सागवेकरगोपाळ तारी आदी उपस्थित होते.

Leave a Reply