मठ वनपरिमंडळमध्ये सुरंगी रोपवनाची लागवड

जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून कुडाळ वनपरिक्षेत्रातील मठ वनपरिमंडळमध्ये वन कक्ष क्रमांक १३६ मध्ये सावंतवाडी वनविभागाचे उपवनसंरक्षक नवकिशोर रेड्डीमठ सरपंच रूपाली नाईकप्रा.धनश्री पाटील यांच्या हस्ते सुरंगी रोपवन लागवड करण्यात आली.

      या कार्यक्रमात सावंतवाडी वनविभागाचे सहाय्यक वनसंरक्षक सुनिल लाड यांच्या मार्गदर्शनाखाली कुडाळ वनक्षेत्रपाल संदिप कुंभारमठ वनपाल सावळा कांबळेमठ वनरक्षक सूर्यकांत सावंत यांच्यासह कुडाळ वनपरिक्षेत्रातील वनपालवनरक्षक व वनमजूर तसेच संयुक्त वनव्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य सहभागी झाले होते. सावंतवाडी वनविभागाचे उपवनसंरक्षक नवकिशोर रेड्डी व कुडाळ वनक्षेत्रपाल संदिप कुंभार यांनी सुरंगी झाडाचे पर्यावरणीय महत्त्व विषद करून मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करण्याचे आवाहन केले.

Leave a Reply