भाजपा तालुकाध्यक्षांनी आपली निष्ठा पक्षावर कि व्यक्तीवर हे पडताळावे – शिवसेना शहरप्रमुख अजित राऊळ

वेंगुर्ला तालुका शिवसेनेच्यावतीने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण तालुक्यात केलेल्या समाजपयोगी कामांच्या धडाक्यामुळे कोणाच्या पायाखालची वाळू सरकली हे सर्व जनतेला ज्ञात आहे. शिवसेना तालुकाप्रमुख शिवसेना पक्षावर निष्ठा ठेऊन कार्य करीत आहेत. त्यामुळे भाजपा तालुकाध्यक्षांनी आपली निष्ठा ही पक्षावर आहे की कोणा एका व्यक्तीवर आहेहे स्वतः पडताळून पहावेअशा शब्दांत शिवसेना शहरप्रमुख अजित राऊळ यांनी पत्त्युत्तर दिले आहे.

      भाजपाच्या वेंगुर्ला तालुकाध्यक्षांनी शिवसेनाप्रमुखांवर केलेल्या टीकेचे उत्तर शिवसेना शहरप्रमुख अजित राऊळ यांनी प्रसिद्धी पत्रकातून दिले आहे.

      वेंगुर्ला तालुका शिवसेना खासदार विनायक राऊतपालकमंत्री उदय सामंत व आमदार दिपक केसरकर यांच्या मार्गदर्शनाखाली वेंगुर्ला तालुक्यात जनतेच्या हिताचे काम करीत आहे. त्यामुळे इतर कोणाच्या सल्ल्याची आम्हाला आवश्यकता नाही. माजी पालकमंत्री दिपकभाई केसरकर हे युती सरकारमध्ये गृहराज्यमंत्री होते. त्यामुळे त्यांना सातत्याने मुख्यमंत्री महोदयांशी संफ साधणे व मुख्यमंत्र्यांना गृहराज्यमंत्र्यांशी संफ साधणे गरजेचे होते.गेल्या ५ वर्षाच्या कालावधीमध्ये मंत्री म्हणून राज्यामध्ये व पालकमंत्री म्हणून सिंधुदुर्गात केलेल्या विकासकामांच्या धडाक्यामुळे पुन्हा एकदा शिवसेना खासदार व २ आमदार जिल्ह्यामध्ये निवडून आले. परंतु शिवसेना पक्षामध्ये समान संधी दिली जाते. शिवसेना पक्षामध्ये पक्षप्रमुख जो निर्णय घेतात तो सर्व नेत्यांना व कार्यकर्त्यांना मान्य असतो. याबाबतीत दिपकभाई केसरकर यांनी वेळोवेळी प्रसार माध्यमातून पक्षप्रमुखांनी दिलेला निर्णय मला मान्य असून माझी याबाबतीत कोणतीही नाराजी नाहीअसे संबोधित केले आहे.

      तसेच तालुकापमुख यशवंत उर्फ बाळू परब हे सातत्याने गेली १० वर्षे तुळस जिल्हा परिषद मतदार संघामध्ये काम करीत आहेत व तुळस पंचायत समिती मतदार संघाचे विद्यमान सदस्य आहेत. आज संपूर्ण तालुक्यामध्ये शिवसेना पक्षाचे निष्ठेने काम करीत असून आपल्या पं.स.मतदार संघामध्ये सुद्धा जनतेच्या हिताचेच काम करीत आहेत. त्याची कोणालाही काळजी करण्याची आवश्यकता नाही, असे अजित राऊळ यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

Leave a Reply

Close Menu