सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक अच्युत परब सेवानिवृत्त

वेंगुर्ला पोलिस स्थानकाचे सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक अच्युत एकनाथ परब हे ३१ मे २०२० रोजी आपल्या ३६ वर्षाच्या सेवेतून निवृत्त झाले. त्यानिमित्त त्यांचा वेंगुर्ला पोलिस स्टेशनतर्फे शालश्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

      यावेळी पोलिस निरीक्षक तानाजी मोरेपीएसआय पाटीलपीएसआय केसरकरमहिला पोलिस उपनिरीक्षक रुपाली गोरडएएसआय दाभोलकरजाधवहवालदार सचिन सावंतपरब व इतर स्टाफ आदी उपस्थित होते. वेंगुर्ला येथे १९९० ते १९९५ पर्यंत कॉन्स्टेबल१९९६ ते २००० कणकवली येथे२००१ ते २००६ वेंगुर्ला येथे,२००७ ते २००९ देवगड येथे पोलिस नाईक२०१० ते २०१४ कुडाळ येथे हवालदार२०१४ ते २०१५ मालवण येथे२०१५ ते २०१६ ओरोस येथे त्यानंतर २०१७ ते मे २०२० या कालावधीत वेंगुर्ला शहर बिटतसेच त्यानंतर सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक म्हणून चांगले काम केले. सत्काराच्या वेळी त्यांनी आपल्या सेवा कालावधीत सर्व सहकारी स्टाफवरिष्ठजिल्हा वरीष्ठ यांचे चांगले सहकार्य लाभल्याचे सांगितले.

Leave a Reply

Close Menu