हळदीचे पीक उत्पन्न म्हणून घ्या!- डॉ.प्रसाद देवधर

सिधुदुर्ग भारतीय जनता पार्टीतर्फे जिल्हाभर ‘सिधु आत्मनिर्भर अभियान‘ राबविण्यात येत आहे. या अंतर्गत माजी आमदार रविद्र चव्हाण यांच्या सौजन्याने वेंगुर्ला, सावंतवाडी, कुडाळ आणि मालवण तालुक्यातील महिला बचतगटांना मोफत हळद बियाणे वाटप केले जात आहे. वेंगुर्ला येथील बचतगटांना सदरची बियाणे वाटप करण्याचा कार्यक्रम १३ जून रोजी पिराचा दर्गा येथील भाजपा कार्यालयात डॉ.प्रसाद देवधर यांच्या प्रमुख उपस्थितीत व सिधु आत्मनिर्भर अभियानचे जिल्हा संयोजक अतुल काळसेकर यांच्या हस्ते पार पडला.

      हळदी लागवडीसाठी ६० रुपये गुंतविल्यास ती तुम्हाला ४०० रुपयांचे उत्पन्न मिळवून देते म्हणूनच हळदीच्या पानांसाठी नाही तर हळदीचे पीक म्हणून उत्पन्न घ्या. हळद लावल्यानंतर ९ महिन्यांनी तिच्यापासून उत्पादन मिळते. पण शेवटचे तिन महिने हे त्या पिकाच्यादृष्टीने महत्वाचे आहेत. दर तीन वर्षांनी एकदा हळदीचे बियाणे बदला. हळद लावण्यासाठी मोठी जागा किवा परसबाग हवीच असं नाही, शहरासारख्या ठिकाणी आपल्या टेरेसवरही छोट्या स्वरुपात हळदीचे उत्पादन घेता येऊ शकते असे सांगत वेंगुर्ला शहर आज स्वच्छ व सुंदर बनत आहे. या स्वच्छ सुंदरतेबरोबरच शहराची समृद्धीही झाली पाहिजे. त्यासाठी प्रत्येकाने आत्मनिर्भर बना असे आवाहन भगिरथ प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. प्रसाद देवधर यांनी केले. या कार्यक्रमाला जिल्हा उपाध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना देसाई, नगराध्यक्ष दिलीप गिरप, तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर, तालुका सरचिटणीस बाबली वायंगणकर, ज्येष्ठ नेते बाळा सावंत, महिला शहर अध्यक्षा प्रार्थना हळदणकर, माजी सभापती सारिका काळसेकर, आडेली सरपंच समिधा कुडाळकर तसेच भाजपाच्या अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह तालुक्यातील बचतगटांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

Leave a Reply

Close Menu