कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांना निवेदन

येत्या ३१ डिसेंबर या दिवशी रात्री किल्ले, पर्यटनस्थळे, ऐतिहासिक आणि सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणे, धूम्रपान करणे, पाट्यार् करणे व सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडणे असे गैरप्रकार होतात. तरी पोलिसांनी या ठिकाणी कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी नियोजन करुन सुसंस्कृत आणि नीतीमान समाज घडवण्यास सहकार्य करावे अशी मागणी हिदु जनजागृती समितीच्यावतीने वेंगुर्ला पोलीस निरीक्षक यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी समितीचे महेश जुवलेकर, चंद्रकांत ठाकूर, गोपाळ जुवलेकर, योगिता जुवलेकर, दाजी नाईक, प्रविण कांदळकर आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Close Menu