आरवलीत भाजपाचे तर सागरतीर्थवर शिवसेनेचे वर्चस्व

            वेंगुर्ला तालुक्यातील सागरतीर्थ ग्रामपंचायतीवर पुन्हा एकदा शिवसेना पुरस्कृत पॅनेलने तर आरवली ग्रामपंचायतीवर असलेल्या शिवसेनेच्या सत्तेवर भाजप पुरस्कृत पॅनेलने वर्चस्व प्रस्थापित केले आहे. सागरतीर्थच्या विद्यमान सरपंच शितल कुडव यांना १४७ मतांनी तर विद्यमान उपसरपंच राजेश प्रभाकर गोडकर यांनाही ७ मतांनी पराभव पत्करावा लागला आहे.

      येथील तहसिल कार्यालयात आज मतमोजणी प्रक्रिया पार पडली. सागरतीर्थ ग्रामपंचायत प्रभाग क्र.१ मधून प्रणय बागकर (अपक्ष), स्मिता फर्नांडीस व मेरी फर्नांडीस (शिवसेना), प्रभाग क्र. २ मधून ज्ञानदेव चोपडेकर (शिवसेना), पांडुरंग फोडनाईक (काँग्रेस), सुषमा गोडकर (काँग्रेस) तसेच प्रभाग क्र. ३ मधून एकनाथ कुडव (शिवसेना), गायत्री गोडकर (अपक्ष) या निवडून आल्या असून समृद्धी कुडव यांची यापूर्वीच बिनविरोध निवड झाली आहे.

      आरवली ग्रामपंचायत प्रभाग क्र.१ मधून प्रविण मेस्त्री (राष्ट्रवादी), समिर कांबळी (भाजपा), रिमा मेस्त्री (भाजपा), प्रभाग क्र. २ मधून किरण पालयेकर (शिवसेना), शिला जाधव (भाजपा), वैशाली रेडकर (शिवसेना),    प्रभाग क्र. ३ मध्ये तातोबा कुडव (भाजपा), सायली कुडव (भाजपा), अक्षता नाईक (शिवसेना) या निवडून आल्या आहेत. निकाल जाहिर झाल्यानंतर शिवसेना, भाजप व काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी आपापल्या विजयी उमेदवारांचे पुष्पहार घालून अभिनंदन करीत जल्लोष केला. 

Leave a Reply

Close Menu