नविन इमारतीत लसीकरण सुरु

वेंगुर्ला ग्रामीण रुग्णालयाच्या जुन्या इमारतीत सुरु असलेल्या लसीकरणादरम्यान तेथील अपू-या सोईसुविधांमुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत होता. वेंगुर्ला न.प.ने याकडे तातडीने लक्ष घातले असून उपजिल्हा रुग्णालयाच्या नविन इमारतीत सदरचे लसीकरण सुरु केले आहे. यासाठी न.प.ने त्या इमारतीत इंटरनेट कनेक्शन, नागरिकांना बसायला खुर्च्या, फॅन्स, तात्पुरत्या स्वरुपाचा विद्युत पुरवठा आदींची उपलब्धता करुन दिली आहे. शहरामध्ये वॉर्डनिहाय नोडल अधिका-यांची नियुक्ती केली असून लसीकरणासाठी रुग्णालय आणि नागरिक यांच्यामधील दुवा म्हणून हे नोडल अधिकारी काम पहात आहेत. त्यामुळे रुग्णालयात होणारी अतिरिक्त गर्दी कमी झाली असून तेथील डॉक्टर्स, नर्स व अन्य आरोग्य कर्मचारी यांच्यावर असलेला ताण कमी झाला असल्याची माहिती वैद्यकीय अधिक्षक डॉ.अतुल मुळे यांनी दिली आहे.

Leave a Reply

Close Menu