वेंगुर्ल्यात ऑक्सीजन बेड मिळवून देण्यासाठी करणार प्रयत्न

कोविड-१९ साथरोगाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्हा परीषद आरोग्य व शिक्षण समिती सभापती डॉ.अनिषा दळवी यांनी आज शुक्रवारी वेंगुर्ला तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र व उफद्रांना भेटी देवून पहाणी केली. या भेटीदरम्यान आरोग्य विभागाचा आढावा घेऊन डॉ. दळवी यांनी तालुक्यात कोविड सेंटरला ऑक्सीजन बेड मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.

      आजच्या दौर्‍-यात त्यांनी आडेली प्राथमिक आरोग्य केंद्रहोमिओपॅथिक मेडिकल कॉलेजग्रामीण रुग्णालयवेंगुर्ला शहररेडी प्राथमिक आरोग्य केंद्रमाऊली हॉस्पिटलरेडीउप जिल्हा रुग्णालय-शिरोडाआरवली संशोधन केंद्र व हॉस्पिटलउफद्रपरबवाडा आणि तुळस प्राथमिक आरोग्य केंद्र येथे भेट देऊन आढावा घेतला.

      यावेळी त्यांचेसोबत वेंगुर्ला पंचायत समिती गटविकास अधिकारी सौ.उमा घारगे पाटीलवेंगुर्ला तालुका आरोग्य अधिकारी डॉ.अश्विनी माईणकरआधार फाउंडेशनचे नंदन वेंगुर्लेकर व इतर अधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Close Menu