कोकण कृषी विद्यापीठाचे संशोधन शेतक-यांपर्यंत पोहोचवणार

               कोकण कृषी विद्यापीठाने गेल्या ४९ वर्षामध्ये १९ संशोधन केंद्र१४ विस्तार योजना३५ संशोधन प्रकल्प आणि ६५० प्रात्यक्षिक प्रयोग यातून शेतीविकासाचे नवे मॉडेल विकसित केले आहे. लाखी बागेचा प्रयोग आता हेक्टरी २.५० लाख उत्पन्नापर्यंत विस्तारीत करण्यात आला आहे. मसाला पिकांवर भर देण्यात आला आहे. कृषी विद्यापीठाचे संशोधन सुवर्ण महोत्सवी वर्षात प्रत्येक शेतक-याच्या दारात पोहोचावे असे उपक्रम हाती घेतले जातील अशी माहिती कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. संजय सावंत यांनी दिली.

          सुवर्ण महोत्सवी वर्षाची माहिती देण्यासाठी विद्यापीठाने व्हर्च्यूअल पत्रकार परिषद आयोजित केली होती. या पत्रकार परिषदेला विस्तार शिक्षण संचालक डॉ. संजय भावेसंशोधन संचालक डॉ. पराग हळदणकरशिक्षण संचालक डॉ. सतीश नारखेडेकृषी कुलसचिव डॉ. भरत साळवी आदी उपस्थित होते.

      कोकण कृषी विद्यापीठ १९ मे पासून ५० वर्षात पदार्पण करते झाले आहे. या ५० वर्षांत १०० पिकांच्या जातीविविध २२ शेती अवजारे आणि ११०० पिकांचे संशोधन विद्यापीठाने केले आहे. हे शेतक-यांपर्यंत पोहोचवणे आणि जास्तीत जास्त शेतक-यांनी शेती व्यवसायाचा विस्तार करावा म्हणून प्रयत्न करणे यासाठी कृषी विद्यापीठ या सुवर्ण महोत्सवी वर्षात व्यापक योजना राबवत आहे. यासाठी माजी विद्यार्थी आणि लोकप्रतिनिधी तसेच राज्य सरकारचे सहकार्य घेण्यात येणार आहे असेही कुलगुरुंनी स्पष्ट केले. शेतक-यांनी या संशोधनाचा जास्तीत जास्त लाभ घेवून कोरोना काळात जे व्यवसाय गमावलेले तरुण गावाकडे परतले आहेतत्या तरुणांना एक आशेचा किरण शेतीतून मिळावा अशी विद्यापीठाची इच्छा असल्याचेही कुलगुरुंनी सांगितले.

      पालघररायगडठाणेरत्नागिरी व सिंधुदुर्ग या पाचही जिल्ह्यामध्ये कृषी विद्यापीठाचे संशोधन अधिक व्याप्त स्वरुपात पोहोचवण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला. शेतीमध्ये निर्माण झालेले नवे तंत्रज्ञानभातशेतीमधील लाल भाताची जात विस्तारीत करणे आणि चाकरमान्याला भाकरमानी बनवणेजे शेतकरी यशस्वीपणे शेती करीत आहेतत्यांची यशोगाथा सर्वदूर पोहोचवणेमेरा गाव मेरा देश ही संकल्पना विस्तारणे अशी कामे हाती घेतली जात आहेत. आज विद्यापीठाने कृषी विषयक पाच फॅकल्टीमध्ये पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू केले आहेत. आज या विद्यापीठाचे विद्यार्थी अमेरिकेसारख्या प्रगतशील देशातही शेती विषयक धोरण ठरवणा-या संशोधन संस्थेमध्ये अनेक विद्यार्थी यशाची किनार घेवून काम करीत आहेतअसेही कुलगुरुंनी सांगितले.

Leave a Reply

Close Menu