‘मिथिलीन ब्ल्यू‘ला अमेरिकन शास्त्रज्ञांची मान्यता

मालवण येथील रेडकर हॉस्पिटल रिसर्च सेंटरच्या मिथिलीन ब्ल्यूसंबंधित संशोधन प्रबंधाला अमेरिकन सोसायटी ऑफ टॉपिकल सायन्य मेडिसीन अॅण्ड हायजीन सोसायटीच्या शास्त्रज्ञांची मान्यता मिळाली असल्याची माहिती रेडकर हॉस्पिटल रिसर्च सेंटरचे विश्वस्त रविकिरण तोरसकर यांनी दिली.

    कोविडच्या दुस-या लाटेत तरुण वर्गातील मृत्यूचे प्रमाण हे जास्त होते. भारतासह जगातील कित्येक गरीब देश अशा एका औषधाच्या शोधात होते की, जे स्वस्त असेल, सहजपणे उपलब्ध असेल आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे ज्याचे दुष्परिणाम नगण्य असतील. गुजरात येथील शास्त्रज्ञ डॉ.दीपक गोळवलकर यांनी भारतात पहिल्यांदा मिथिलीन ब्ल्यू या औषधाचा उपयोग सौम्य व पहिल्या स्टेजवरच्या कोविड रुग्णांसाठी केला. भारतातील २०० एमडी डॉक्टरांनी एक संशोधन ग्रुपतयार करुन त्याचा उपयोग आपल्या रुग्णांसाठी सुरु केला. यामध्ये रेडकर हॉस्पिटल रिसर्च सेंटर मालवण, गोवा आणि दिनानाथ मंगेशकर पुणे यचा समावेश आहे. त्याबद्दल वैद्यकीय क्षेत्रातील राष्ट्रीय जनरलने व्यापक प्रसिद्धी दिली. मिथिलीन ब्ल्यूचा वापर आणि उपयोगाबद्दल आंतरराष्ट्रीय मान्यता मिळण्याची आवश्यकता होती. डॉ.विवेक रेडकर यांनी या सदर्भात केलेले संशोधन आता अमेरिकेत स्विकृत झाल्याने ते सुद्धा साध्य झाले आहे.  या उपचार पद्धतीचा उपयोग कोरोना टाळण्यासाठी झालाच. शिवाय एआरडीएस न्युमोनिया झालेल्या ब-याच रुग्णांना सलाईनमधून हे औषध दिल्याने त्यांचे प्राण वाचले. व्हेंटिलेटरवरच्या ब-याच रुग्णांचे व्हेंटिलेटर बंद करुन त्यांना फक्त ऑक्सिजनवर जगवता आले. सिधुदुर्गात मिथिलीन ब्ल्यूचा वापर, त्याचा उपयोग याबद्दल जनजागृती करणारे व त्यांच्यापर्यंत पोहोचविणारे दत्ता सामंत (मालवण), अंगणवाडी सेविकांसाठी काम करणा-या कमलताई परुळेकर आणि मुंबईच्या माजी महापौर डॉ.शुभा राऊळ यांचे तोरसकर यांनी आभार मानले. भारतातही याचा वापर अधिकृत करण्यासंदर्भात केंद्र व राज्य सरकार काय पाऊल उचलते याकडे वैद्यकीय क्षेत्राचे लक्ष लागून राहिले आहे.

 

Leave a Reply

Close Menu