कु. पद्मा कृष्णाजी केळकर

गोवा विद्यापीठाचा प्रथम वर्ष बी.ए.एम.एस. अभ्यासक्रमाच्या जानेवारी 2022 मध्ये झालेल्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला. यामध्ये वेंगुर्ल्याची सुकन्या कु. पद्मा कृष्णाजी केळकर हिने भारतीय संस्कृती प्रबोधिनीचे गोमंतक आयुर्वेद महाविद्यालय व संशोधन केंद्र, शिरोडा-गोवा या महाविद्यालयातून 79.23 टक्के गुण मिळवून विशेष प्राविण्यासह गोवा विद्यापीठात प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. अभ्यासक्रमाच्या क्रिया शरीर या विषयामध्ये 82.66 टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक प्राप्त केला. प्राचार्य डॉ. अनुरा बाले, डॉ. विजय नंदवाडेकर, डॉ. समीर जोशी यांचे तिला मार्गदर्शन लाभले. पदार्थ विज्ञान विषयामध्ये 73 टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक प्राप्त केला. डॉ. मोहंती यांचे मार्गदर्शन मिळाले. अष्टांग हृदय विषयामध्ये 71.33 टक्के गुणांसह प्रथम क्रमांक प्राप्त केला. डॉ. समीर जोशी यांचे मार्गदर्शन लाभले. रचना शरीर विषयामध्ये 80.33 टक्के गुणांसह द्वितीय क्रमांक. डॉ. निलेश कोरडे, डॉ. महेश पाटील  यांचे मार्गदर्शन लाभले. संस्कृत विषयामध्ये 90 टक्के गुणांसाह द्वितीय क्रमांक प्राप्त केला. डॉ. कापडी यांचे मार्गदर्शन लाभले. तिच्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष पी.के.घारे, उपाध्यक्ष पांडुरंग देसाई, कार्यवाह गजानन बकले, प्राचार्य डॉ.सौ. अनुरा बोले तसेच शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी वृंद आणि विद्यार्थ्यांनी अभिनंदन केले आहे.

    वेंगुर्ला येथील को.ए.सो.च्या लोकनेते दत्ता पाटील होमिओपॅथीक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.के.जी.केळकर यांची कु. पद्मा ही कन्या आहे.

Leave a Reply

Close Menu