सई उर्फ निखिल मोरे

ब्रह्मांडातील कृष्णविवरांचा अचूक शोध घेणाऱ्या ‘ग्रॅव्हीटी प्लस’ या जागतिक पातळीवरच्या महत्त्वाकांक्षी संशोधन प्रकल्पामध्ये नोबेल विजेत्या वैज्ञानिकांसोबत सहभागी होण्याचा बहुमान वेेंगुर्ल्याची सुकन्या सई उर्फ निखिल मोरे (डॉ. वसुधा व डॉ. नामदेव मोरे यांची कन्या) हिला मिळाला आहे. म्युनिक-जर्मनी येथील मॅक्स प्लांक इन्स्टिट्यूट फॉर एक्स्ट्रा टेरेस्ट्रीयल फिजिक्स या संस्थेमधून सई हिने या नोबेलविजेत्या संशोधकांसोबत काम सुरू केले आहे.

      आपल्या गॅलॅक्सीच्या मध्यभागी कृष्णविवर असल्याचे सिद्ध केल्याबद्दल डॉ. राईन्हार्ड गेेंझेल यांच्याबरोबर ऑक्सफर्ड विद्यापीठाचे गणित विषयाचे प्रोफेसर डॉ. रॉजर पेनरोज आणि कॅलिफोर्निया विद्यापीठाचे ॲस्ट्रोफिजिक्स आणि ॲस्ट्रोनॉमिचे प्रोफेसर आंद्रीया गेझ या तिघा शास्त्रज्ञांना 2020 चे नोबेल पारितोषिक विभागून देण्यात आले होते. यांपैकी प्रमुख वैज्ञानिक डॉ. राईन्हार्ड गेेंझेल यांनी वरील संशोधनाचा पुढील भाग म्हणून ‘ग्रॅव्हीटी प्लस’ या नावाने नवा संशोधन प्रकल्प सुरु केला आहे. या प्रकल्पात सिंधुदुर्गची स्पेस इंजिनियर सई मोरे हिचा समावेश करण्यात आला आहे.  तिला पुढील वाटचालीस सर्ऱ्व स्तरातून शुभेच्छा येत आहेत.

Leave a Reply

Close Menu