पत्रकारांनी सर्वसामान्य लोकांचा आवाज बनण्यासाठी मुकनायक बनावे

ब्रिटीशकाळापासून आतापर्यतचा काळ हा पत्रकारीतेसाठी संघर्षकाळ ठरत आला आहे. पत्रकारांना नेहमीच तटस्थ राहून भुमिका बजावावी लागते. त्याकाळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्वसामान्य लोकांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी मुकनायक‘ हे वृतपत्र सुरु केले होते. आताही पत्रकारांनी सर्वसामान्य लोकांचा आवाज बनण्यासाठी मुकनायक बनावे असे प्रतिपादन वेंगुर्ला पंचायत समितीच्या सभापती अनुश्री कांबळी यांनी केले.

      वेंगुर्ला तालुका पत्रकार समितीचा पत्रकार पुरस्कार वितरण सोहळामान्यवरांचे सत्कार व बक्षिस वितरण असा तिहेरी कार्यक्रम वेंगुर्ला येथील साई डिलक्स हॉल येथे जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष गणेश जेटे यांच्या अध्यक्षतेखाली व कल्याण डोंबिवली मनपाचे उपायुक्त रामदास कोकरे, (ऑनलाईन)जिल्हा दुग्ध विकास संस्थेचे अध्यक्ष एम.के.गावडेमाजी उपनगराध्यक्षा अस्मिता राऊळकाँग्रेसचे तालुकाध्यक्ष विधाता सावंतजिल्हा भंडारी महासंघाचे अध्यक्ष रमण वायंगणकरशिवसेना तालुका प्रमुख यशवंत परबचार्टर्ड इंजिनियर विवेक कुबलजिल्हा पत्रकार संघाचे उपाध्यक्ष रमेश जोगळेमाजी सभापती जयप्रकाश चमणकरपत्रकार संघाचे अध्यक्ष प्रदिप सावंतकाँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष इशाद शेखशहर प्रमुख अजित राऊळयुवासेना प्रमुख पंकज शिरसाठजिल्हा पत्रकार संघाचे कार्यकारीणी सदस्य बाळ खडपकरलक्ष्मीकांत भावेभाजपा जिल्हा सरचिटणिस प्रसना देसाईअॅड.सुषमा प्रभूखानोलकरराष्ट्रीय हॉलीबॉल पंच अशोक दाभोलकरविकास वैद्यबाळू खांबकरदिलिप मालवणकरकैवल्य पवारअनुप काणेकरलोकमान्यचे पुरुषोतम राऊळ आदी उपस्थित होते.

      यावेळी वेंगुर्ला तालुका पत्रकार समितीच्या पुरस्काराचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कै. शशिकांत केसरकर स्मृती आदर्श पत्रकार पुरस्कार प्राप्त दै. तरुण भारतचे भरत सातोस्करकै. अरुण काणेकर स्मृती जेष्ठ पत्रकार पुरस्कार प्राप्त दै. पुढारीचे मॅक्सी कार्डोजकै. संजय मालवणकर स्मृती उत्कृष्ठ पत्रकार पुरस्कार प्राप्त दै. सामनाचे विनायक वारंग व कै. सुमती गंगाराम सावंत स्मृती जिल्हास्तरीय महिला पुरस्कार पाप्त साप्ताहिक किरातच्या संपादिका सिमा मराठे यांना मान्यवरांच्या हस्ते शालश्रीफळसमानपत्रसमानचिन्ह व रोख रक्कम देवून गौरविण्यात आले.

      यावेळी वेंगुर्ला न.प.ला स्वच्छ भारत सर्वेक्षणमध्ये जिल्हाविभागराज्य व राष्ट्रीय पातळीवर अनेक पुरस्कार व करोडो रुपयांची बक्षिसे मिळवून देणारे व त्या माध्यमातून वेंगुर्ला शहराचा कायापालट घडवून आणणारे येथील न.प.चे माजी मुख्याधिकारी तथा कल्याण डोंबिवली मनपाचे उपायुक्त रामदास कोकरे यांचाही मानपत्रसमानचिन्हशालश्रीफळ देवून ऑनलाईन सत्कार करण्यात आला. तसेच यावेळी कुडाळ पत्रकार समितीचा व्याधकार ग.म. तथा भैयासाहेब वालावलकर स्मृती जिल्हास्तरीय आदर्श पत्रकार पुरस्कारप्राप्त दै. तरुण भारतचे तालुका प्रतिनिधी के.जी.गावडेजिल्हा पत्रकार संघाचा जेष्ठ पत्रकार पुरस्कार प्राप्त दै. तरुण भारतचे महादेव उर्फ आपा परबव नागपूर येथील मदत सामाजिक संस्थेचा बाबासाहेब आंबेडकर स्मृती पुरस्कार प्राप्त दै. सकाळचे दिपेश परब यांचाही मान्यवरांच्या हस्ते शालश्रीफळ देवून सत्कार करण्यात आला.

      तसेच वेंगुर्ला तालुका पत्रकार संघाने आयोजित केलेल्या निबंध स्पर्धेतील विजेते श्रद्धा पाटकर (कणकवली)पार्थ परब (देवगड) व संगिता नाईक (सावंतवाडी) यांना सामाजिक कार्यकर्ते विवेक कुबल यांच्या हस्ते बक्षिस वितरण करण्यात आले.

      आज येथे वेंगुर्ला तालुका पत्रकार समितीच्या पत्रकार पुरस्काराचे वितरण झाले. पुरस्कारातून प्रेरणा मिळते व प्रेरणेतून राष्ट्र घडते. लोकशाहीच्या चार आधारस्तंभापैकी पत्रकार व न्यायालय या दोनच आधारस्तंभावर आज लोकांचा विश्वास राहिला आहे. त्यामुळे पत्रकारांनी पत्रकारीतेची धार बोथट होवू देवू नये असे एम.के.गावडे म्हणाले.

      जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष गणेश जेटे यांनी आज पत्रकारीतेमध्ये फार मोठे करीअर नसलेपत्रकारांना आज फार मोठ्या प्रमाणात आर्थिक अडचणी येत असल्या तरी जिल्ह्यातील पत्रकारांनी सचोटी कायम राखली आहे. आजच्या या कार्यक्रमास वेंगुर्ला तालुक्यातील सामाजिकराजकीयशैक्षणिक सर्वच क्षेत्रातील लोक येथे उपस्थित आहेत. याचाच अर्थ येथील पत्रकारीता योग्य ट्रॅकवरुन चालत असल्याचे सांगितले.

      कल्याण-डोंबिवली मनपाचे उपायुक्त रामदास कोकरे यावेळी ऑनलाईन बोलताना म्हणाले कीवेंगुर्ल्यातील पत्रकारांनी स्वच्छतेबाबत सकारात्मक दृष्टीकोन ठेवल्यामुळेच आपण वेंगुर्ल्यात चांगले काम करु शकलो. तसेच तेथील लोकप्रतिनिधीव्यापारीनागरिकसामाजिक संस्था यांनीही चांगली साथ दिली. माझ्यानंतर आलेल्या लोकप्रतिनिधी व प्रशासनाने या स्वच्छतेच्या कामात सातत्य ठेवले. त्यामुळेच २० ते २५ पुरस्कार व २२ करोड रुपयांचा निधी वेंगुर्ला नगरपरिषदेला मिळू शकला. वेंगुर्ला ही स्वच्छतेची जननी बनली.

      यावेळी जयपकाश चमणकरविधाता सावंतयशवंत परबरमण वायंगणकर यांनीही मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमास आमदार दिपक केसरकर यांनी ऑनलाईन शुभेच्छा दिल्या. सिमा मराठे यांनी मानपत्राचे वाचन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रदिप सावंतसुत्रसंचालन महेंद्र मातोंडकर तर आभार पत्रकार संघाचे उपाध्यक्ष के.जी. गावडे यांनी मानले.

Leave a Reply

Close Menu