दशावताराच्या इतिहासावर प्रकाश टाकणारे आगामी पुस्तक

दशावतार ही कोकणच्या भूमीवर रुजलेली आणि फोफावलेली प्राचीन लोकनाट्य कला आहे.  1985 साली तत्कालीन बॉम्बे युनिव्हर्सिटीत अशोक भाईडकर यांनी केवळ तीन वर्षात अथक परिश्रम करून शेकडो दशावतारी नाटके पाहून आणि त्यातील काही नाटकांचे ध्वनिफितीवर मुद्रण करुन त्यांच्या संहिता बनवल्या. दशावतारी लोकनाट्य या विषयावरील जगातील कुठल्याही विद्यापीठात सादर होणारे हे पहिले व मूलस्वरुप संशोधन आहे. अनेक ऐतिहासिक आणि भौगोलिक दस्तऐवजांचा शोध घेऊन विविध संशोधन पद्धतींचा वापर करुन विद्यापीठात प्रबंध (1000 पानांचा) सादर केला व त्याला पीएच्‌.डी. मिळाली. त्यानंतर हा प्रबंध पुस्तक रुपात प्रसिद्ध व्हावा अशी अनेक मान्यवरांची इच्छा असल्यामुळे ते पुस्तक रुपात लवकरच प्रसिद्ध होत आहे.

      आज जे दशावतारी लोकनाट्याचे स्वरुप दिसते ते प्राचीन काळी तसे नव्हते. प्राचीन काळी दशावतारी लोकनाट्य कसे होते, त्याचा आकृतिबंध, त्याची भाषा कशी होती, सादरीकरण कसे केले जाई, वेगवेगळ्या प्रकारचे मुखवटे कसे वापरत, वेगवेगळे नृत्यप्रकार कसे सादर होत अशा विविध पैलूंचा या पुस्तकात शोध घेतला आहे.

      साडेतीनशे पृष्ठ असलेले हे पुस्तक 2500 रु.ला असून मर्यादीत प्रती असल्याने आगाऊ बुकिंगसाठी संपर्क – कौतुक मुळे- 9226937924

Leave a Reply

Close Menu