नगराध्यक्ष दिलीप गिरप यांना ‘कोकण आयडॉल‘ पुरस्काराने सन्मानीत

कोकण भूमी प्रतिष्ठान-समृध्द कोकण प्रदेश संघटनेने महाराष्ट्र राज्यातील कोकण भागात जनतेसाठी महत्वपूर्ण कामगिरी करणा-या व देशांत नावलौकीक मिळविलेल्या अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांचा ग्लोबल कोकण उद्योग परीषदेत कोकण आयडॉल‘ या पुरस्काराने मुंबई येथील कार्यक्रमांत सन्मान करण्यात आला. यात वेंगुर्ला नरगपरिषदेचे माजी नगराध्यक्ष दिलीप गिरप यांनी वेंगुर्ला येथे शुन्य कचरा नियोजन प्रकल्प गेल्या ५ वर्षात यशस्वीपणे राबविला. संपूर्ण भारत देशांत वेंगुर्ला नगरपरिषदेच्या शून्य कचरा नियोजनाचे धडे गिरविण्यासाठी तत्कालीन नगराध्यक्ष दिलीप गिरप यांनी सर्व नगरसेवक व प्रशासनाचे कर्मचारी तसेच नागरीकांना विश्वासांत घेऊन काम केले. या महत्वपूर्ण कामासाठी दिलेल्या योगदानाबद्दल कोकण आयडॉल‘ या पुरस्काराने श्री. गिरप यांचा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांच्या हस्ते सत्कार व सन्मान करण्यात आला.

      सन्मानपत्रसन्मानचिन्ह व लोकमान्य टिळकशिवाजी महाराजव डॉ. बाबासाहेब आंबेडकर एकत्रित असलेले स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. यावेळी विधान परिषद सदस्य निरंजन डावखरेपितांबरी प्रोड्युसर प्रायव्हेट लिमिटेडचे अध्यक्ष रविंद्र प्रभू-देसाईमहाराष्ट्र राज्य कृषिपणन मंडळाचे व्यवस्थापकिय संचालक सुनिल पवारकिसान कनेक्टचे अध्यक्ष सारंग निर्मळसिडकोचे निवृत्त अधिकारी चंद्रकांत संघवीकोकण सृष्टीचे संचालक दिलीप शिर्केपुनीत गौरवचे संचालक गौतम प्रधानहिरवळ प्रतिष्ठानचे अध्यक्ष किशोर धारीयाकोकण भूमी प्रतिष्ठान व ग्लोबल कोकणचे संस्थापक संजय यादवराववेंगुर्ला नगरपरीषदेचे माजी नगरसेवक सुहास गवंडळकरप्रशांत आपटे आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Close Menu