पर्यटन मंत्र्यांची कृषी प्रदर्शनास भेट

वेंगुर्ला येथील मधुसूदन कालेलकर सभागृहात जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी सिंधुदुर्ग व प्रादेशिक फळ संशोधन केंद्र वेंगुर्ला यांच्या संयुक्त विद्यामाने आयोजित केलेल्या कृषी प्रदर्शनास पर्यटन व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी भेट देऊन समाधान व्यक्त केले. चांदा ते बांदा योजनेंतर्गत कृषी विकास महाराष्ट्र शासन व प्रादेशिक फळ संशोधन केंद्र, वेंगुर्ला यांनी राबविलेल्या विविध उपक्रमांचे प्रदर्शन मांडण्यात आले होते. या प्रदर्शनामध्ये आंबा, काजू, चिकू, काळे तांदुळ आदी फळे ठेवण्यात आली होती.

Leave a Reply

Close Menu