किरातच्या नुतनीकरण केलेल्या वास्तूचे उद्घाटन

वेंगुर्ला येथील किरात साप्ताहिकाने शंभराव्या वर्षात पदार्पण केले आहे. दरम्यान, ज्या ठिकाणाहून साप्ताहिक किरात व किरात ट्रस्टचा कार्यभार चालवला जातो त्या इमारतीचे नुतनीकरण करणे आवश्‍यक बनले होते. यासाठी मदतीचे आवाहनही केले होते. या आवाहनाला किरातचे हितचिंतक व वाचक यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सर्वांच्या सहकार्याने नुतनीकरण झालेल्या या किरातच्या वास्तूचे उद्घाटन अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर किरात ट्रस्टचे विश्वस्त मनमोहन दाभोलकर आणि रघुवीर उर्फ भाई मंत्री यांच्या हस्ते झाले. यावेळी माजी नगरसेवक प्रशांत आपटे, प्राजक्ता आपटे, प्रदीप परब, प्रज्ञा परब, ॲड. सूर्यकांत प्रभूखानोलकर, आर्टीस्ट सुनिल नांदोस्कर, पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रदिप सावंत, संदिप परब, ॲड.शशांक मराठे, किरातचे व्यवस्थापक सुनिल मराठे आणि संपादक सीमा मराठे आदी उपस्थित होते.

      उद्घाटनानंतर किरातच्या बहुसंख्य वाचक, हितचिंतक आणि जाहिरातदार यांनी उपस्थित राहून किरातचे व्यवस्थापक, संपादक आणि कर्मचारी यांना शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Close Menu