भविष्यात रस्सीखेच जिल्ह्यातील अग्रेसर खेळ म्हणून नावारुपाला येईल-आमदार केसरकर

टग ऑफ वॉर फेडरेशन ऑफ इंडियाच्या मान्यतेने व शिरोडा वेळागर सर्वे नं. ३९ मित्रमंडळाच्या सहकार्याने महाराष्ट्र टग ऑफ वॉर सिंधुदुर्गने येथे राष्ट्रीयस्तरावरील रस्सीखेच स्पर्धा शिरोडासारख्या ग्रामीण भागात आयोजित केली हे कौतुस्कास्पद आहे. नजिकच्या काळात रस्सीखेच स्पर्धा जिल्ह्यातील अग्रेसर खेळ म्हणून नावारुपाला येईल असे प्रतिपादन आमदार दिपक केसरकर यानी केले.

      शिरोडा-वेळागर येथे आयोजित करण्यात आलेल्या ३५ व्या सिनियर नॅशनल टग ऑफ वॉर बीच रस्सीखेच चॅम्पयनशिप २०२२ स्पर्धेचे उद्घाटन आमदार दिपक केसरकर यांच्या हस्ते शुक्रवारी सायंकाळी करण्यात आले. यावेळी व्यापिठावर जिल्हा रस्सीखेच संघटनेचे अध्यक्ष तथा वेळागर सर्वे नं. ३९चे नेते जयप्रकाश चमणकरराष्ट्रीय रस्सीखेच संघटनेचे सचिव मदन मोहनमहाराट्र राज्य रस्सीखेच्या अध्यक्षा व आशियाई रस्सीखेच्या सचिव माधवीताई पाटीलराज्य सचिव गुपीलेस्पर्धा समितीचे प्रमुख उदय भगतशिरोडा सरपंच मनोज उगवेकरजिल्हा क्रिडा अधिकारी विद्या शिरसजिल्हा माहिती अधिकारी श्री. सातपुते यांच्यासह सुधीर भगतसमिर भगतआनेल सोजफ्रान्सीस फर्नांडिसआजू आमरेअब्रास मेननरुपेश तारीश्याम भगतनेल्सन सोजपास्कॉल फनाडिसप्रा.संजय खडपकरनिलेश चमणकरअॅड.वेता पिळणकर-चमणकरकृषि राष्ट्रीय पदक विजेते दादा मावळणकरत्रिंबक आजगावकरमाजी सरपंच विजय पडवळदिपक पडवळशिवसेना तालुका प्रमुख यशवंत परबउपजिल्हाप्रमुख सुनिल डुबळेशहर शिवसेना प्रमुख अजित राऊळकौशिक परबजगनाथ डोंगरे आदी उपस्थित होते.

      आमदार दिपक केसरकर यांनी शुभेच्छा देताना या स्पर्धेचे नियोजन अत्यंत कमी वेळेत चांगल्याप्रकारे केल्याबद्दल रस्सीखेच संघटनेचे अध्यक्ष जयपकाश चमणकरसचिव किशोर सोनसुरकरवेळागर सर्वे नं. ३९ मित्रमंडळ व शिरोडा ग्रामवासियांचे अभिनंदन केले. तर जिल्हा रस्सीखेच संघटनेचे अध्यक्ष जयप्रकाश चमणकर यानी या स्पर्धेत काश्मीर पासून केरळ पर्यंतचे सर्व खेळाडू ज्या एकजूठीने सहभाग घेतात हिच खरी राष्ट्रीय एकात्मता असल्याचे सांगितले.

      या स्पर्धेच्या उदघाटनापूर्वी स्पर्धेचे उद्घाटक आमदार दिपक केसरकर यांना राष्ट्रीय क्रिडा स्पर्धेत सहभागी झालेल्या ६५० खेळांडूना मानवंदना दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाराष्ट्र राज्य रस्सीखेच्या अध्यक्षा व आशियाई रस्सीखेच्या सचिव माधवीताई पाटील व राष्ट्रीय सचिव मदन मोहन तर सुत्रसंचालन जिल्हा रस्सीखेच संघटनेचे सचिव किशोर सोनसुरकर यांनी केले.

Leave a Reply

Close Menu