स्नेहा नार्वेकर हिने केला विश्वविक्रम

अरबी समुद्रात बॅक स्विमिंग करत २० मिनिटांत तब्बल १२ रुबिक क्यूब प्रकार सोडवण्याचा विश्व विक्रम सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला येथील स्नेहा रंजन नार्वेकर हिने केला आहे. वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ इंडियाच्यावतीने सन्मानपत्र व मेडल देऊन स्नेहाचा सन्मान करण्यात आला. १४ वर्षाखालील वयोगटातील हा विश्वविक्रम करणारी भारतातील ती पहिली किशोरवयीन मुलगी ठरली आहे. वेंगुर्ला नगरपरिषदेच्या जलतरण तलावाच्या ठिकाणी वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ इंडियाचे विशेष प्रतिनिधी संजय नार्वेकर आणि सुषमा संजय नार्वेकर यांनी प्रमाणपत्र, सन्मानपत्र व गोल्ड मेडल देऊन स्नेहाचा सन्मान केला. यावेळी स्विमिंग प्रशिक्षक दीपक सावंत, सुरेंद्र खामकर, राजेंद्र प्रभूसाळगांवकर, नारायण बर्वे, अमेय रेडकर, मानसी रेडकर, राहुल कांबळे, तुषार परब, स्नेहाचे आई वडील वडील रंजन नार्वेकर व मानसी नार्वेकर, ध्रुव गवंडळकर, स्मिता शिवलकर आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Close Menu