वेंगुर्ल्यात विविध संस्थांनी साजरा केला योगदिन

            वेंगुर्ला येथे विविध संस्थांनी आठवा आंतरराष्ट्रीय योग दिन योगाच्या विविध आसनांची प्रात्यक्षिके करुन साजरा केला.

      महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सिधुदुर्ग यांच्या निर्देशान्वये तालुका विधी सेवा समिती वेंगुर्ला व तालुका बार असोसिएशन वेंगुर्ला यांच्या संयुक्त विद्यमाने न्यायालय वेंगुर्ला येथे आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला. सुरुवातीला सकाळी ६ ते ७ या वेळेत आंतरराष्ट्रीय योग दिनाचे थेट प्रक्षेपण प्रसारीत करण्यात आले. त्यानंतर ७ ते ७.४५ या वेळेत योग प्रशिक्षक अभिषेक नाईक यांनी योगाबाबत विस्तुत माहिती सांगून उपस्थितांकडून प्रात्यक्षिके करुन घेतली. यावेळी २० न्यायालयीन कर्मचारी सहभागी झाले होते.

       बॅ.खर्डेकर महाविद्यालयात योगा प्रशिक्षिका मिनाक्षी आरावंदेकर यांच्या मार्गदर्शनाखाली योगाची प्रार्थना, पुरक हालचाली, ताडासन, वृक्षासन, अर्धचक्रासन, दंडासन, भद्रासन, भुजंगासन, प्राणायाम, ध्यानासन, कपालभाती इत्यादी आसनांची प्रात्यक्षिके घेतली. प्रारंभी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्राला उद्देशून केलेले योगाचे मार्गदर्शन थेट प्रक्षेपणाद्वारे दाखविण्यात आले. यावेळी प्रभारी प्राचार्या डॉ.धनश्री पाटील, क्रिडा संचालक जे.वाय.नाईक, सुरेंद्र चव्हाण, प्रा.एस.टी.भेंडवडे, प्रा.व्ही.पी. नंदगिरीकर, डॉ.मनिषा मुजुमदार, प्रा.के.आर.कांबळे, प्रा.आर.जी.चौगले, प्रा.एस.सी. चुकेवाड, प्रा.बी.जी.गायकवाड, प्रा.हेमंत गावडे, प्रा.बी.बी.जाधव यांच्यासह महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. हा कार्यक्रम प्राचार्य डॉ.विलास देऊलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला.

      वेंगुर्ला नगरपरिषद आणि सिंधुदुर्ग योग प्रसार संस्था सिंधुदुर्ग संचलित डॉ. वसुधाज योगा अॅण्ड फिटनेस अॅकॅडमी यांच्या सहयोगाने नगरपरिषदेच्या स्वामी विवेकानंद हॉलमध्ये योग दिन उत्साहात साजरा केला. कार्यक्रमाचे उद्घाटन राम पोळजी यांच्या हस्ते झाले. यावेळी मुख्याधिकारी डॉ. अमितकुमार सोंडगे, कार्यकारी अधिकारी संगिता कुबल, माजी नगरसेवक सुहास गवंडळकर, वृंदा गवंडळकर, डॉ. राजेश्वर उबाळे, सिंधुदुर्ग योग प्रसार संस्थेचे अध्यक्ष डॉ.योगेश नवांगुळ, डॉ. दिपाली पालयेकर, कु.मारीया आल्मेडा आदी उपस्थित होते. नवाबाग शाळेच्या विद्यार्थ्यांनी योगनृत्य सादर केले. तर योगदिनाच्या प्रथेप्रमाणे डॉ.दिपाली पालयेकर आणि कु.मारीया आल्मेडा यांनी उपस्थितांकडून योगाभ्यास करवून घेतला. तसेच डॉ.योगेश नवांगुळ आणि मुख्याधिकारी डॉ.अमितकुमार सोंडगे यांनी योगसाधकांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला बहुसंख्य योगसाधक व नागरिक उपस्थित होते.

Leave a Reply

Close Menu