►अनुजा तेंडोलकर यांच्या आत्मचरित्राचे १० रोजी प्रकाशन

सिधुदुर्ग जिल्ह्यातील एक गृहिणी, इंटरनॅशनल पॉवर लिफ्टर ते महिला उद्योजक अनुजा तेंडोलकर यांच्या पोलादी-एक अष्टपैलू व्यक्तिमत्वया आत्मचरित्राचे प्रकाशन ज्येष्ठ नाटककार गंगाराम गवाणकर यांच्या हस्ते तर तेंडोलकर यांच्या पेंटींग्जच्या कलादालनाचे उद्घाटन आंतरराष्ट्रीय चित्रकार अरुण दाभोलकर यांच्या हस्ते १० ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता साई मंगल डिलक्स हॉल, वेंगुर्ला येथे होणार आहे.

      यावेळी किशोर सोन्सुरकर, प्रविण गुरव, राजन माडये, अशोक मुळे, डॉ.अशोक भाईडकर आदी उपस्थित रहाणार आहेत. तेंडोलकर यांच्या पेंटींग्ज विक्रीसाठी उपलब्ध असून पेंटींग्जच्या विक्रीतून जमा होणारा ५० टक्के निधी जिल्ह्यातील खेळाडूंसाठी दिला जाणार आहे. या कार्यक्रमाला उपस्थित रहावे असे आवाहन अमेय अशोक तेंडोलकर, भुमिका राहूल रेडकर व नम्रता मुळे यांनी केले.

Leave a Reply

Close Menu