चांगल्या लेखकासाठी चांगल्या वाचकाची गरज

वेंगुर्ला येथील आनंदयात्री वाङ्मय मंडळाच्यावतीने कथालेखन यावर कथा सृजनाच्या वाटेवरया कार्यक्रमांतर्गत वृंदा कांबळी यांनी कथाबीजाची प्रेरणा लेखकाच्या मनात कशी होते, कथानिर्मितीच्या दीर्घ प्रवासातील महत्त्वाचे टप्पे, लघुकथा म्हणजे काय, लघुकथा व कादंबरी यातील फरक, लघुकथा लेखनासाठी आवश्यक बाबी, लघुकथेची वैशिष्ट्ये, कथेतील महत्त्वाचे घटक याबाबत मार्गदर्शन केले. यावेळी रविद्र परब, अजित राऊळ, प्रदिप केळुसकर, संजय पाटील, विशाल उगवेकर, ईश्वर धडके, सोमा गावडे, महेश राऊळ, श्राव्या कांबळी, राजश्री परब, प्रीतम ओगले, प्राजक्ता आपटे, माधवी मातोंडकर, राऊळ, श्री.कौलापुरे, पि.के.कुबल आदी उपस्थित होते. लघुकथेच्या अभ्यासासाठी किरातच्या संपादक सीमा मराठे यांनी मधु मंगेश कर्णिक यांच्या पारणेया लघुकथेचे अभिवाचन केले. यावेळी कथेवरील झालेल्या चर्चेत उपस्थितांनी सहभाग घेतला. चांगला लेखक होण्यासाठी चगला वाचक होणे गरजेचे आहे. वेंगुर्ला तालुक्याला समृद्ध अशी साहित्य परंपरा लाभलेली आहे. अधिकाधिक लेखकांनी कथा वाङ्मय प्रकारात लेखन करावे त्यासाठी लागणारे श्रम, वाचन, अभ्यास करावा व वेंगुर्ल्याची साहित्य परंपरा पुढील पिढीने जतन करावी असे आवाहन वृंदा कांबळी यांनी केले. प्रास्ताविक प्रा.सचिन परुळकर यांनी तर आभार गुरुदास तिरोडकर यांनी मानले.

Leave a Reply

Close Menu