शिक्षकांच्या समस्या सोडविणार-केसरकर

शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांचा वेंगुर्ला नगरपरिषदेतर्फे १४ ऑगस्ट रोजी सत्कार करण्यात आला. यावेळी प्रांताधिकारी प्रशांत पानवेकरमुख्याधिकारी डॉ.अमितकुमार सोंडगे, तहसिलदार प्रविण लोकरे, माजी नगराध्यक्ष दिलीप गिरप, माजी नगरसेवक प्रशांत आपटे, सुहास गवंडळकर, नागेश गावडे, शितल आंगचेकर, कृपा गिरप, पूनम जाधव, श्रेया मयेकर यांच्यासह सचिन वालावलकर, नितीन मांजरेकर, सुनिल मोरजकर व अन्य उपस्थित होते. शिक्षण विभागात शिक्षकांच्या मोठ्या प्रमाणात समस्या आहेत. या सर्व समस्या सोडविण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिदे यांचे लक्ष वेधणार आहे. शिक्षणातून पिढी घडत असते. महाराष्ट्राचे भवितव्य या शिक्षण खात्यात आहे. त्यामुळे शिक्षण हे महत्त्वाचे असल्याने हे महत्त्वाचे खाते आहे. या खात्यावर मी समाधानी असल्याचे शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांनी सांगितले.

    नगरपरिषदेच्या विकासकामांसाठी १२ कोटींचा निधी दिला आहे. जोपर्यंत नगरपरिषदेवर कौन्सिल बॉडी येत नाही, तोपर्यंत विकासकामांसाठी दिलेला निधी राखून न ठेवता विकास कामांची प्रक्रिया सुरु ठेवण्यासंदर्भात श्री. केसरकर यांनी मुख्याधिकारी यांना सूचना दिल्या.

 

Leave a Reply

Close Menu